गुढी पाडवा आणि आयुर्वेद :

आज चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा. मराठी आणि हिंदू नवीन वर्षाचा पहिला दिवस. असं म्हटल्या जाते की आजच्या दिवसशी ब्रह्म देवांनी सृष्टी उत्पत्ति केली होती आणि आजच्या शलिवाहनांनी शकांवर विजय मिळवला होता. आज आपण गुढी उभारुन त्याची ब्रह्मध्वज म्हणून पुजा करतो आणि नवीन वर्षाची सुरुवात करतो.

पण याचे अजून देखील खूप मोठे महत्व आयुर्वेद शास्त्रात आहे. वाग्भट संहितेनुसार चैत्र आणि वैशाख हे दोन महीने वसंत ऋतुचे असतात असे संगितले आहे. त्यामुळे ढोबळ मनाने जर बघायला गेले तर आज पासून वसंत ऋतुची सुरुवात होते.

ऋतुसंबंध आणि आयुर्वेद :

वसंत ऋतु हा इतर ऋतु प्रमाणे शरीरात वेगवेगळे बदल घडवून आणतो.  वसंत ऋतूमध्ये शिशिर ऋतूमध्ये साठलेला  कफ दोष हा उन्हाच्या उष्णतेने वितळायला सुरुवात होते .  त्यामुळे या काळात विविध कफचे आजार होण्याची दाट शक्यता असते.  त्यासाठी त्या विकृत कफाचे निर्हरन करण्यासाठी या ऋतुमध्ये वासंतिक वमन हे केले जाते.

गुढी पाडवा आणि आयुर्वेद संबंध :

पण हे सर्व झाले ते वसंत ऋतु आणि आयुर्वेदाबद्दल, त्यात आजच्या म्हणजे गुढी पाडव्याचा काय संबंध?? सांगतो!! आज गुढी उभारतांना काय काय वस्तु लागतात?

वेताची काठी, नवीन वस्त्र, चफ्यांच्या फुलांची माळ , साखरेची माळ किंवा गाठी, कडू निंबपाला, आंब्याची पाने आणि तांब्याचा गडवा किंवा लोटा. याचा आयुर्वेदाशी कसा संबंध ते बघूया..

वेताची काठी : ही वंश म्हणजेच बांबु सारखी दिसणारी पण नारळाच्या वर्गातील वनस्पति आहे. हिला बुंध्यावरती काटे असून लांब थोडे अरुंद असे पान असतात.  ही वनस्पति भरीव असून  स्वरक्षणासाठी वापरीली जाते.

चाफा : ही वनस्पति कफ शामक, पित्त शामक आणि वात शामक एकूण त्रिदोष शामक आहे. तसेच याचे विशेष प्रभाव रक्त धातुवर आहे. त्यामुळे ही दाह म्हणजे आग कमी करणारी आहे.

साखरेची माळ: साखर ही मधुर रस म्हणजे चवीला गोड, विपाक म्हणजे पचल्यवर गोड स्वरूप होणारी आणि तिचा वीर्य कार्य शक्ति ही शीत म्हणजे थंड आहे. गूळ हा साधारण साखरेच्या तुलनेत गरम असतो. त्यामुळे यापुढे उन्हाळयात गुळाएवजी साखर वापरली जाते.

निंब पाला : निंब ही कडू रस आणि शीत वीर्य अशी वनस्पति आहे. निंबाचा कोवळा पाला हा किंचित कडू आणि तुरट रस असतो. त्यामुळे तो कफ शामक आणि उष्णतेपासून संरक्षण करणारा आहे. तसेच कृमी म्हणजे जंत, जखम यांना भरुन काढणारा, दाह म्हणजे शरीराची आग कमी करणारा, विविध त्वचा विकारांवर उपयोगी असा आहे.

आंब्याची पाने : आंब्याची पाने ही मंगल कारक आणि शुभ मानली जातात. अंबायची पाने ही व्रणरोपक म्हणजे जखम भरुन आणणारे आणि रक्त धातुवर कार्य करणारे आहे. तसेच कोवळे आंब्याची पाने ही  स्तंभक म्हणजे शरीरातून अतिरिक्त प्रमाणात बाहेर पडणार्‍या द्रव्यांना थांबवतात.  याचा उपयोग फांट स्वरुपात औषद्धांमध्ये केला जातो.

निष्कर्ष :

अशा प्रकारे हे सर्व द्रव्य आयुर्वेद वनस्पति उपयोगी असून येणारा ऋतु क्रमामध्ये वापरली जाते. त्यामुळे त्यांचा उपयोग हा विविध सण उत्सवात वापरुन त्यांचे महत्व जपले जाते.

आपल्या सर्वांना चैत्र पाडवा (गुढी पाडवा) आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेचा !!

Read More

चेहर्‍यावरील मुरुम आणि पुटकळ्यांसाठी आयुर्वेदिक उपचार

चेहरा हा सौंदर्याचा एक प्रतीक आणि अभिव्यक्तीचं स्थान आहे. चेहरा तुमचे आरोग्य आणि पाचन तंत्र याचा देखील समर्पक असा विश्लेषण करुन देणारा आहे. त्यामुळे कुठलाही आजार झाल्यावर त्याचे पडसाद हे चेहर्‍यावर दिसून येतात. जसे की थकवा असल्यास चेहराम्लान दिसतो.  त्यमुळे चेहर्‍यवार कुठलेही डाग किंवा मुरुम पुटकळया हा लोकांना काळजीचा विषय होतो. कारण त्यामुळे त्यांना कुठे तरी आत्मविश्वास कमी झालेला वाटतो.  आणि प्रत्येक व्यक्तिला आयुष्यात कधी तरी मुरुम पुटकूळ्या यांनी भेदावलेले असते.

मुरुम किंवा पुटकूळ्या प्रामुख्याने पौगंडावस्थेत चेर्‍यावर येतात आणि कालांतराने त्यांचे प्रमाण कमी होते. पण काही चुकीच्या खान-पान च्या सवयींमुळे त्यांचे प्रमाण कमी न होता वाढते व त्यांचे एक त्वचा विकारात रूपांतर होते. आधुनिक औषध शस्त्रानुसार त्यावर काही अॅंटीबायोटिक्स आणि आणि चेहर्‍याला लावला क्रीम सांगितल्या जातात; ज्यांचा ठराविक काळपुरता परिणाम दिसून येतो. मात्र आयुर्वेदानुसार  मुरुम किंवा पुटकूळ्या यांची चिकित्सा करतांना सर्वांगीण गोष्टींचा विचार करुन केली जाते. या लेखामध्ये आपण मुरुम आणि  पुटकूळ्या उत्पन्न होण्याची कारणे, त्यांचे आयुर्वेदिक आणि पंचकर्म उपचार, तसेच योग्य असा आहार आपण बघणार आहोत.

 परिचय :

मुरुम आणि  पुटकूळ्या या साधारणपणे पौगंडावस्थेत चेर्‍यावर येण्यास सुरुवात होते  आणि कालांतराने त्यांचे प्रमाण कमी होते. काही अवस्थेत यावर योग्य असे औषध उपचार घ्यावे लागतात. हे प्रामुख्याने त्वचाविकार असण्याची शक्यता असते.  प्रौढावस्थेत याचे करणे हॉर्मोन्स, मानसिक ताण  आणि त्वचेची अयोग्य काळजी न घेणे यामुळे जास्त प्रमाणात होतात.

आयुर्वेदिक मत :

आधी सांगितल्या प्रमाणे, चेहरा तुमचे आरोग्य आणि पाचन तंत्र याचा देखील समर्पक असा विश्लेषण करुन देणारा आहे. त्यामुळे कुठलाही आजार झाल्यावर त्याचे पडसाद हे चेहर्‍यावर दिसून येतात.  याचे कारण असे की चेहरा हा रस, रक्त, मांस आणि शुक्र धातु यांचे स्थान आहे. आणि याच धातूंमध्ये दोष म्हणजे वात , पित्त आणि कफ यांचा प्रादुर्भाव वाढला की मुरूम आणि पुटकुळ्या निर्माण होतात.

 

चेहर्‍यावरील मुरुम आणि पुटकळ्या येण्याची कारणे :

  • होर्मोन्स मध्ये होणारे बदल
  • पोटाचे विकार
  • पाचन तंत्रातील बिघाड
  • चिरकाळ असणारी अॅसिडीटी
  • अपुरी झोप
  • बाहेरचे आणि अयोग्य खाद्य पदार्थ
  • त्वचेची काळजी न घेणे

इत्यादि सर्व करणे हे चेहर्‍यावरील मुरुम आणि पुटकळ्या येण्यासाठी करणीभूत ठरतात.

 

मुरुम आणि पुटकुळ्या यांचे आयुर्वेदिक निदान :

  1. युवान पीडिका
  2. मुख दूषिका
  3. क्षुद्र कुष्ठ
  4. रक्तदुष्टि

मुरुम आणि पुटकुळ्या साठी असे काही आयुर्वेदिक निदान करतांना येतात.

मुरुम आणि पुटकुळ्या साठी आयुर्वेदिक चिकित्सा:

कुठल्याही व्याधीची चिकित्सा करतांना त्याचा सर्वांगीण विचार करावा हे आयुर्वेद शास्त्राची चिकित्सा पद्धती आहे. ही चिकित्सा पद्धत मुरुम आणि पुटकुळ्या साठी सुध्दा लागू आहे. नुसतं चेहर्‍यावर क्रिम लावून किंवा लेप लावणे ही मुरुम आणि पुटकुळ्या साठी चिकित्सा नाही. तर योग्य निदान करुन आयुर्वेदिक औषधे सोबतच पंचकर्म उपचार, लेप आणि योग्य आहार- विहार अशी मुरुम आणि पुटकुळ्यासाठी संपूर्ण आयुर्वेदिक चिकित्सा अवलंबली जाते.

मुरुम आणि पुटकुळ्या साठी आयुर्वेदिक औषधे:

सर्व सामान्य पणे लागू पडतील अशी औषधे आम्ही सांगत आहोत, (तरी कृपया तज्ञ आयुर्वेदिक डोक्टरांचा सल्ला घ्यावा)

  1. लघुमंजिष्ठादी काढा 10 मि.लि. समभाग पाण्यासह दोन्ही वेळा जेवणानंतर
  2. सिरप साफी 10 मि.लि. समभाग पाण्यासह दोन्ही वेळा जेवणानंतर
  3. सरिवादी वटी 250 मि. ग्राम दिवसातून 2 वेळा
  4. त्रिफळा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यासह (कोष्ठानुसार )

 मुरुम आणि पुटकुळ्या साठी आयुर्वेदिक बाह्य लेप चिकित्सा :

सर्व सामान्य पणे लागू पडतील अशी लेपऔषधे आम्ही सांगत आहोत, (तरी कृपया तज्ञ आयुर्वेदिक डोक्टरांचा सल्ला घ्यावा)

  1. घरघुती साधा सोपा लेप: हळद पावडर + निंब पान चूर्ण + गुलाब पाकळी चूर्ण + मुलतानी माती सर्व समभाग घेणे. आणि आवश्यक तेवढे चूर्ण घेऊन पाणी किंवा गुलाब पाण्यात मिसळून त्याचा लेप करणे.
  2. रजनी लेप
  3. रक्त चन्दनादी लेप

मुरुम आणि पुटकुळ्यासाठी पंचकर्म उपचार :

वमन हे आमाशय मधील सर्व विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते. त्यामुळे रस धातूची निर्मिती आणि कार्य सुधारते. तसेच शरीरात साठलेला अतिरिक्त कफ जो की मुरुम आणि पुटकुळ्या निर्माण करण्यास करणीभूत ठरतो.

विरेचन ही जठर आणि आतड्यांमध्ये  सर्व विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते. त्यामुळे रक्त धातूची निर्मिती आणि कार्य सुधारते. तसेच शरीरात साठलेला अतिरिक्त पित्त बाहेर काढते जे  की मुरुम आणि पुटकुळ्यामध्ये पु किंवा लसीका स्त्राव  निर्माण करण्यास करणीभूत ठरतात.

रक्तमोक्षण हे शरीरातून दूषित रक्त बाहेर काढते. या साठी जलौका नामक एक प्राणी वापरला जातो जो विषारी दूषित रक्त शोषून घेऊन वारंवार होणार्‍या मुरुम आणि पुटकुळ्या निर्मिती वर आळा घालते. आणि त्वचेचे आरोग्य सुधारते.

मुरुम आणि पुटकुळ्या कमी करण्यासाठी योग्य आहार  उपचार:

सुंदर आणि नितळ त्वचा असण्यासाठी उत्तम असा सकस आहार असणे आवश्यक आहे, त्यात विशेषतः सर्व ताजी फळे आणि भाज्या योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे. आणि सर्व आहार हा तुमच्या प्रकृती, अग्नि आणि वय यांचा संपूर्ण  विचार करुन  घ्यावा. यामध्ये तूप असणे तर आवश्यक आहेच.

अधिक माहितीसाठी आमचे पूर्वीचे पथ्यकर आहार संकल्पना आणि आयुर्वेद : भाग १ ते ४ ही लेख मालिका आवर्जून वाचा।

  1. https://www.ayurvidhiclinic.com/%e0%a4%aa%e0%a4%a5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%86/ 
  2. https://www.ayurvidhiclinic.com/%e0%a4%aa%e0%a4%a5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%86-2/
  3. https://www.ayurvidhiclinic.com/%e0%a4%aa%e0%a4%a5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%86-3/
  4. https://www.ayurvidhiclinic.com/%e0%a4%aa%e0%a4%a5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%86-4/

 निष्कर्ष :

आयुर्वेद औषध उपचारांनी मुरुम आणि पुटकुळ्या यांना छानपणे घालवता येते. आयुर्वेद उपचार हे पुर्णपणे नैसर्गिक आणि उपद्रव रहित आहेत. त्यामुळे चिंतेची कुठलीही बाब नाही.

आम्ही आमच्या आयुर्विधी क्लिनिक मध्ये अनेक रुग्णांना मुरुम आणि पुटकुळ्या वर पृर्णपणे आयुर्वेदिक आणि पंचकर्म उपचार देऊन बरे केले आहे.

आमचा पत्ता :

आयुर्विधी क्लिनिक – आयुर्वेद पंचकर्म केंद्र , ऑफिस नं 309, तिसरा मजला, पार्क प्लाझा बिझनेस सेंटर , पोरवाल रोड, लोहगाव, पुणे 411047 .

Read More

केसांचे आरोग्य आणि आयुर्वेद

केशपतन आजच्या धावपळीच्या जगात एक सामान्य तक्रार झालेली आहे. काही तुम्ही सुद्धा ह्याने हैराण झालेले आहेत का? त्या थांबवण्यासाठी आणि केशांची वाढ निरोगी तसेच लांब घनदाट केसांसाठी काही आयुर्वेदिक पूर्णतः नैसर्गिक उपचार शोधत आहेत का? तर तुमच्या या केसांच्या तक्रारींसाठी आयुर्वेद शास्त्रकडे अनुभूत आणि खात्रीशीर असे उपाय आहेत. या लेख मध्ये आपण केस गळण्याचे कारण, त्यांचे आयुर्वेदिक निदान आणि चिकित्सा पाहणार आहोत.

केसपतन सामान्य दृष्टीकोण :

काही वर्षांपूर्वी झालेल्या एक संशोधनात असे आढळून आले आहे की एक सर्व सामान्य माणसांमध्ये दरदिवशी किमान 100 केस हे गळतात कमी जास्त प्रमाणात व ते नंतर नवीन येणार्‍या केसांनी बदलले जातात. मात्र त्या पेक्षा जास्त केश गळणे व नवीन केश तयार न होणे हि एक आरोग्याची तक्रार व चिंतेची बाब असू शकते.

केश पतन आणि आयुर्वेद दृष्टीकोण :

आयुर्वेदानुसार केश हा अस्थि धातूचा उपधातू आणी मज्जा धातूचा मल स्वरुपात उत्पन्न होतो. तसेच त्याचा पोषणामध्ये  रस धातु आणि रक्त धातु हे महत्वाची भूमिका पार पडतात.   त्रिदोष दुष्टि या सर्व गोष्टीस बाधा उत्पन्न करते. वात दोष रौक्ष्य उत्पन्न करुन केश गळण्यास कारण ठरतो. तर कफ आणि वात संयोग हा केश कुप बंद करुन नवीन उत्पन्न होणार्‍या केश वाढी मध्ये अडथळा करतो.

केस गळण्याची कारणे आयुर्वेद शास्त्रानुसार :

  • रात्री जागरण
  • अवेळी जेवण
  • पोटाचे आजार जसे की एसिडिटी, अल्सर, IBS
  • मद्यपान
  • धूम्रपान
  • अति प्रमाणात पित्तावर्धक आहाराचे सेवन
  • अति राग किंवा चिडचिड
  • मानसिक ताण आणि तणाव
  • पूर्वीचे जुने आजार जसे ताप, टायफाईड, गोवर, कांजण्या इत्यादि

इतर काही महत्वाची केस गळतीची कारणे :

  • B 12 जीवनसत्व कमतरता
  • D जीवनसत्व कमतरता
  • रक्ताची कमतरता

केसांची गळती कमी होण्यासाठी आयुर्वेदिक चिकित्सा:

केसगळती तक्रार कमी करताना आयुर्वेदानुसार त्याचा मुळाशी जाऊन कारणे शोधून त्याचे निवारण करुन चिकित्सा केली जाते. केसगळतीची आयुर्वेद चिकित्सा करताना आहार – विहार सुधारणे, तसेच योग्य पथ्य पालन करणे, तसेच आयुर्वेदिक औषधे आणि पंचकर्म उफार यांचा संपूर्ण एक सूत्रीपणाने काम केले जाते. या सोबतच केस लांब घनदाट वाढीसाठी विविध तेल लावणे हा सुद्धा एक उत्तम उपाय आहे.

 

केसांची गळती कमी होण्यासाठी आयुर्वेदिक उपाय :

  1. सकाळी अनुषापोटी अर्धा चमचा च्यवनप्राश खाणे
  2. अर्धा चमचा आवळा पावडर मधासह दिवसातून 2 वेळा घेणे
  3. जर मानसिक ताण आणि तणावमुळे केस गाळत असतील तर ब्राह्मी चूर्ण 250 मिलिग्राम मध किंवा पाण्यासह दिवसातून 2 वेळा घेणे
  4. केसांची वाढ होण्यासाठी अस्थिपोषक वटी 1-1 गोळी दिवसातून दोन वेळा घेणे.
  5. नारसिंह रसायन अर्धा चमचा सकाळी अनुषापोटी घेणे

 

केस गळणे कमी होण्यासाठी आणि वाढीसाठी काही आयुर्वेदिक तेल :

  1. वटजटादी तेल
  2. महा भृंगराज तेल
  3. सुकुंतल तेल (आयुर्विधी क्लिनिक द्वारा निर्मित )
  4. जपाकुसुमादी तेल

उपरोक्त सर्व तेल हे उत्तम केसांची निगा राखणारे आणि केसांची वाढ करणारे आहे.

केसांच्या तक्रारीसाठी पंचकर्म उपचार :

पंचकर्म ही आयुर्वेदाची शोधण उपचार पद्धती असून त्यामुळे शरीरात साठलेले सर्व दोष हे जवळच्या मार्गाने बाहेर काढले जातात. यामुळे केसांचे आरोग्य आणि केसांची वाढ होण्यास मदत होते.

वमनमुळे आमाशय आणि त्याला संलग्न असलेल्या अवयवतून सर्व दोष बाहेर काढले जातात. त्यामुळे पाचन सुधारून रस धातु पुष्ट होतो आणि केस वाढवण्यास मदत होते.

बस्ति हा केसांच्या समस्यांवर एक रामबाण उपाय आहे. बस्ति हा प्रामुख्याने वाताच्या प्रधान स्थान असणार्‍या पक्वाशयावर कार्य करतो त्यामुळे वात शमन होऊन केसांचे आरोग्य अबाधित राहते.

नस्य ही एक शामक स्वरुपात केस विकारांमध्ये वापरली जाते. नाकामध्ये योग्य असे तेल किंवा तूप सोडल्यामुळे थेट शिरामध्ये असणार्‍या केसांच्या मुळांवर कार्य करते आणि त्यांची वाढ होण्यास मदत करते.

रक्तमोक्षण यामुळे दुष्ट रक्त शरीरातून बाहेर काढले जाते. या क्रियेमुळे डोक्यामध्ये फोड, पूरल आणि कोंडा ह्या समस्यांचे निवारण होते. दुष्ट रक्त केस गळण्याचे एक कारण  असल्यामुळे रक्त मोक्षण हे फायद्याचे ठरते.

शिरोधारा मध्ये माथ्यावर तेलाची धार धरल्या जाते. त्यामुळे मानसिक ताण आणि तणाव कमी होत, झोप सुधारते. या सोबतच केसांच्या मुळांना बल प्रदान करते व केसांचे आरोग्य सुधारते. 

केसांच्या आरोग्यासाठी आहार विहार:

केसांच्या सुयोग्य वाढीसाठी आणि केस गळती थांबवण्यासाठी सकस आहार तुमच्या जेवणात आवश्यक आहे. त्यामध्ये योग्य प्रमाणात प्रथिने असणे आवश्यक आहे. जेवणात सर्व भाज्या , डाळी, भात आणि पोळी यांचा समावेश असावा. तसेच आवळा, दूध, तूप, लोणी, सुका मेवा जसे अक्रोड, बदाम, काळे मानूके, खोबर, खजूर  हे विशेष करुन असावे.

रात्री जागरण, धूम्रपान, मद्यपान, अति तळलेले पदार्थ, आंबट पदार्थ आणि अंबवलेले पदार्थ कटाक्षाने टाळावे.

विहार: मानसिक तान आणि तनाव हे केस गळतीचे प्रमुख कारण आहे. ते टाळणायस्थी प्राणायाम हा उत्तम उपाय आहे. अनुलोम-विलोम, भ्रामरी, सीतली, सित्कारी हे फार फायद्याचे ठरतात.

तसेच चंद्र-नमस्कार, पर्वतासन, वृक्षासन, अधोमुख श्वनासन हे योगा उपाय करावे. हे सर्व केसांचे गळणे थांबवण्यास व वाढीस मदत करते.

निष्कर्ष:

केसांच्या तक्रारींसाठी आयुर्वेदिक उपचार हे फार फायद्याचे ठरतात, कारण आयुर्वेदिक चिकित्सेमध्ये सर्व बाबींचा विचार करुन चिकित्सा उपक्रम हा आखला जातो. आयुवेदिक औषधे हे केसांना वाढ होण्यास आणि गळणे थांबवते तर पंचकर्म उपचार हे दोषांना शरीरातून बाहेर काढते. तर सुयोग्य आहार विहार हा दोषांचे शरीरातील समतोल रखणायस मदतकर ठरतात.

अशाच प्रकारच्या केसांच्या सर्व तक्रारींवर संपूर्ण खात्रीशीर आयुर्वेदिक आणि पंचकर्म उपचार आयुर्विधी क्लिनिकमध्ये उपलब्ध आहेत.

Read More

आम्लपित्त (एसिडिटी) : कारणे, लक्षणे आणि आयुर्वेद पंचकर्म उपचार

आसिडिटी किंवा आम्लपित्त ही आजच्या जगात बर्‍याच लोकांना भेडसावणारी एक सर्व सामान्य व्यथा झाली आहे. बरेच लोक वेगवेगळे घरघुती उपाय करतात किंवा पित्त कमी करणार्‍या गोळ्या (antacid) घेतात. पण त्याचा काही विशेष फरक दिसत नाही. पण हे गोळ्या खाऊन आम्लपित्त कमी करणे जर बर्‍याच काल पर्यन्त तसेच सुरु  राहिले तर मग त्याचे दुष्परिणाम मात्र कालांतराने दिसून येतात. आयुर्वेद मात्र आम्लपित्तकडे चिकित्सा दृष्टीने सर्व बाजूने वियचार करतो.  जसे त्याचे हेतु, आहार, विहार, आणि औषधोपचार. या लेखामध्ये आपण या सर्व बाबींना जाणून घेऊ या.

एसिडिटी आणि आयुर्वेदिकमत :

आम्लपित्त हे असिडिटी साठी केल्या जाणारे सर्व सामान्य निदान आहे. आम्लपित्त  या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. आम्ल म्हणजे आंबट  रसाने युक्त किवा विकृत झालेले पित्त.  हे विकृत पित्त स्वतःच्या प्रकृत गुण आणि कर्मांचा त्याग केल्यामुळे विविध तक्रारी निर्माण करतात.

आम्लपित्ताची सामान्य लक्षणे :

  • पोटात आग किंवा जळजळ
  • छातीत आग किंवा जळजळ
  • अपचन
  • मळमळ
  • क्वचित उलटीचा त्रास होणे
  • डोक दुखणे
  • गरगल्या सारखे वाटणे

अम्लपित्ताचे उपद्रव :

आम्लपित्ताची उपेक्षा केल्यास  म्हणजे योग्यवेळी उपचार न केल्यास पुढील तक्रारी उद्भवू शकतात;

  • पोटाचे गंभीर आजार
  • पोटाचे अल्सर किंवा आताड्यांना छिद्र पडणे
  • हाड कमकुवत होणे
  • सांधे दुखी
  • डोक्यात कोंडा होणे
  • केस गळणे

अम्लपित्ताचे सामान्य हेतु (आयुर्वेद मते ):

खाण्याच्या चुकीच्या सवयी

वेळेवर जेवण न करणे

वेळ उलटून गेलयवर जेवण करणे (उशिरा जेवणे )

आंबट किंवा आंबवलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाणे

मद्यपान

पोटात आम संचिती

मानसिक ताण आणि तनाव

उष्ण वातावरणमध्ये काम करणे इत्यादि

 

आम्लपित्त टाळण्यासाठी काही आयुर्वेद तिल सामान्य उपाय:

पथ्य किंवा आहारीय बदल :

 

  1. जेवणाच्या वेळा नियमित करणे : वेळेवर भुक लागल्यावर जेवण करणे हा अम्लपित्त टाळण्याचा उत्तम उपाय आहे. आम्लपित्ताचे मूळ हे जठराग्नीच्या वैषम्यतून असल्याकारणाने वेळेवर जेवण केल्याने वात प्रकोप कमी होते, तसेच पाचक रसांचे स्रवण योग्य रीतीने होण्यास मदत करते.
  2. अनारोग्यदायी पदार्थास आळा: अनारोग्यदायी  पदार्थ जसे  बाहेरचे चिप्स, पाकीट मध्ये मिळणारे इतर पदार्थ हे आम्लपित्त उत्पन्न करण्यास कारणीभूत ठरतात. कारण हे सर्व पदार्थ आयुर्वेद अनुसार शिळ्या पदार्थांच्या श्रेणीत येतात. व त्यामुळे ते पचायला जड होऊन आम्लपित्ता उत्पन्न करतात. त्यामुळे ते टाळेलेच बरे.
  3. जेवणातील उष्मांक नियंत्रण : जास्त तेलकट किंवा जास्त तळेले पदार्थ शरीरात अजीर्ण निर्माण करून आम्लपित्त त्रास उत्पन्न करु शकतात.
  4. फलाहारचा स्विकार : आम्लपित्तामुळे होणार्‍या पोटात आग आणि जळजळ तसेच मळमळ ह्या साठी सकाळी नाश्तामध्ये विविध प्रकारचे ताजे फळ खाणे हे उत्तम उपाय आहे. टरबूज, खरबूज, डाळिंब, चिकू, सीताफळ, आवळा ही काही फळे आम्लपित्त शमन करण्यास उत्तम निवड आहे. ही सर्व फळ मधुर रस युक्त, पित्तास शमवणारी असून पोटाचे आरोग्य उत्तम प्रकारे जपणारी आहेत.
  5. अम्लपिता वाढवणार्‍य गोष्टींचा अस्विकार : आम्लपित्त वाढवणारी पदार्थ जसे आंबट, अंबवलेले, शिळे पदार्थ, बाहेरचे पदार्थ, अति प्रमाणात चहा किवा कॉफी, मद्यपान आणि धुम्रपान हे कायमचे टाळावे.

आम्लपित्त टाळण्यासाठी काही सामान्य असे आयुर्वेदिक उपाय :

प्रत्येक व्यक्ति ही वेगवेगळे दोष आणि प्रकृती संगठन घेऊन जन्माला आलेली असते. त्यामुळे प्रत्येक रुग्ण जारी एक सारखे व्याधी लक्षण घेऊन रुग्णालयात आला तरी त्याच्या उपचारासाठी वापरली जाणारी औषधे ही वेगळी असू शकतात. त्यामुळे वाचकांना ही विनंती की कृपया कुठेलेही औषधोपचार घेण्यापूर्वी तज्ञ वैद्यांचा सल्ला घ्यावा.

तरी काही सामान्य अशी सर्वांस लागू पडतील असे काही आयुव्रेदिक औषधे पुढील प्रमाणे आहे:

  • सकाळी अनुषापोटी अर्धा चमचा साधारण ३ ग्राम आवळा पावडर मधासह
  • धण्याचे पानी दिवसभरात थोडे थोडे पिणे
  • ज्येष्ठमध पावडर मधासह घेणे
  • अर्धा चमचा गुलकंद सकाळ संध्याकाळ
  • अर्धा चमचा मोरावळा सकाळ संध्याकाळ खाणे

आम्लपित्तामध्ये उपयुक्त असे पंचकर्म उपचार:

वमन आणि विरेचन हे आम्लपित्त व्याधीमध्ये अतिशय उपयुक्त ठरणारे असे पंचकर्म उपचार आहे. आम्लपित्ताचे मुळ असणारा आम हा शरीरातून बाहेर काढून शरीर शुद्ध करते.

निष्कर्ष / सारांश :

आम्लपित्त व्याधीची चिकित्सा करतांना आयुर्वेद सर्वांगीण बाजूने विचार करतो. योग्य पथ्यकर आहार विहार आणि आयुर्वेदिक औषधोपचार सह पंचकर्माने आम्लपित्त मूळापासून बरं करण्यास मदत करते.   

प्रत्येक रुग्णांसाठी वैयक्तिक आयुर्वेदीय सल्ला आणि उपचार हे आयुर्वेदिक वैद्यांकडून घेणे आवश्यक आहे. आयुर्वेदिक वैद्य हे तुमचे नाडी, प्रकृती, दोष संगठन, आणि अवस्था यांचा पूर्ण तपासणी करुन तुम्हाला औषधे आणि पंचकर्म सुचवतात. आयुर्विधी क्लिनिक मध्ये रुग्ण आल्यावर त्याची सविस्तर लक्षणे समजून घेऊन योग्य ते निदान करुन चिकित्सा करतो. त्यमुळे तुमच्या आम्लपित्ताचे योग्य हेतु शोधून व्याधी योग्य निवारण करतो.

पत्ता : डॉ. कौस्तुभ बाठे, आयुर्विधी क्लिनिक – आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक, ऑफिस नं 309, तिसरा मजला, पार्क प्लाझा बिझनेस सेंटर, पोरवाल रोड, लोहगाव, पुणे 411047.

 

Read More

डोळ्यांचे आरोग्य आणि आयुर्वेद उपचार

गेल्या दशकापासून भारतात संगणक (कॉमप्यूटर), मोबाईल यांचा अतिवापर तसेच  इतर कारणांमुळे डोळ्यांचे आजार वाढले आहेत. आयुर्वेद या प्राचीन चिकित्सा शास्त्रात नेत्र संबंधित व्याधी व त्याचे उपचार यांचे यथासांग वर्णन मिळते. सुश्रुत संहितेत नेत्रविकार व चिकित्सा वर्णन आहे.

चक्षुः तेजोमऽयं तस्य विशेषात् श्लेष्मणो भयं।

आयुर्वेदात डोळा हा एक ज्ञानेंद्रिय स्वरुपात वर्णन आहे. त्याचे अधिष्ठान हे नेत्र तर अवलोकन करणे किंवा पाहणे हे कर्म आहे. तेज महाभूत हे त्याचे महाभूत द्रव्य असल्याने हा अवयव अग्नि महाभूत प्रधान आहे.  जशा प्रकारे अग्निला पाण्याची भीती असते तशाच प्रकारे डोळ्यांना कफाचे विकार होण्याची भीती जास्त असते, असे आयुर्वेदमत.

 

आयुर्वेदानुसार डोळ्यांचे विकार होण्याची कारणे : (आयुर्वेदीयमत) 

आयुर्वेदानुसार नेत्रसबंधित व्याधी उत्पन्न होण्यासाठी काही कारणे आहेत. ती अशी पुढील प्रमाणे आहे:

उष्णभितत्पस्य जलप्रवेशाद् दूरेक्षणात स्वप्नविपर्ययाच।

प्रसक्त संरोदन कोपशेक क्लेशाभिघातादतिमैथुनाच्च॥

शुक्तारनालाम्लकुल्थमाषविषे बणा व्देग विनिग्रहाच्च।

स्वेदादथो धूमनिषेवाणच्च छर्देविघाताव्दमनाति योगात्।

बाष्पग्रहात् सुक्षनिरीक्षणाच्च नेत्रे विकारान् जनयन्ति दोषाः॥

सु. ऊ. २६/२७

 

वरील श्लोकामध्ये नेत्र रोगांची सर्व कारणे एकत्र दिली आहेत. सर्व सामान्यपणे समजण्यासाठी  ती मुख्यत्वे काही गटांमध्ये विभागून मांडत आहोत.

 

 विरुध्द आहार : विदाही अन्न ( जसे भेळ, पाणीपुरी इत्यादि;), उष्ण मसाल्याचे पदार्थ, मादक पदार्थ ( मद्य, भांग, तंबाखू इत्यादि)

मिथ्या विहार : रात्री जागरण, डोळ्यांनी अत्याधिक काम करून विश्रांति न घेणे, अति रडणे, किंवा अश्रूंचा वेग धारण करणे , अत्याधिक क्रोध किंवा शोक, अधिक धूळ किंवा धुराच्या ठिकाणी राहणे किंवा काम करणे, सूक्ष्म वस्तूंचे अधिक काळ निरीक्षण करणे, अति प्रकाशात बसणे किंवा जास्त प्रकाशाच्या गोष्टी कडे जास्त वेळ बघणे  इत्यादि.

आगंतुज कारणे: आघात, जंतु संसर्ग, अचानक तीव्र प्रकाश डोळ्यांवर पडणे असे

व्याधी उपद्रव स्वरुपात निर्मित:  मधुमेह किंवा थायरोइड मुळे काही उपद्रव स्वरूपात्मक

 

डोळ्यांचे विकार:

  • डोळ्यांच्या चष्म्याचा नंबर वाढणे
  • डोळ्यांमध्ये कोरडेपणा जाणवणे (नेत्र शुष्कता )
  • डोळे लाल होणे ( नेत्र आरक्तता )
  • धुसर दिसणे
  • डोळ्यांवर ताण येणे
  • डोकं दुखणे
  • मोतीबिन्दु (Cataract)
  • रेटाईनल दित्यच्मेंट (Retinal Detachment)
  • कोर्नेयल डिसोर्डर (Corneal Diseases)

हे काही नेत्र विकार सर्व सामान्यपणे आजरोजी दिसतात.

 

काही घरघुती व सोपे उपाय :

बर्‍याच व्याधींमध्ये सामान्यपणे करता येण्यासारखे उपाय पुढे सांगत आहोत.

  • गुलाब जल : डोळ्यांना आग किंवा जळजळ किंवा लाल होणे असा त्रास असल्यास गुलाब जल घालणे हा उपाय करता येऊ शकतो.
  • निरश्या दुधाच्या पट्ट्या ठेवणे : गुलब जल नसल्यास उपरोक्त लक्षणांमध्ये डोळ्यांवर निरश्या दुधामध्ये कापूस बुडवून त्या बंद डोळ्यांवर ठेवल्या तरी उत्तम आराम पडतो.
  • चष्मा किंवा गॉगल वापरणे: बाहेर गाडीवर किंवा उन्हात फिरतांना गॉगल वापरणे सुद्धा डोळ्यांसाठी हितकर ठरू शकते.
  • अंजन किंवा काजळ घालणे : डोळ्यांमध्ये रोज उत्तम प्रतीचे रोज सुद्ध तुपापासून निर्मित काजळ घालणे सुद्धा डोळ्यांकरिता हितकर व लाभदायी ठरते.

वरील उपाय बर्‍याच प्रमाणात डोळ्यांचे विकारांपासून बचाव करुन त्यांचे आरोग्य जपण्यास मदत करू शकतात.

*(वरील सर्व उपाय हे संसर्ग जन्य व्याधींमध्ये करु नये. करण्यापूर्वी तज्ञ डोक्टरांचा सल्ला घ्यावा.)*

डोळ्यांचे व्यायाम :

  • डोळे वर्तुळाकार गोल फिरवणे (सरळ आणि उलट रित्या)
  • डावीकडे उजवी कडे बघणे
  • वर आणि खाली बघणे
  • दोन्ही हात एकमेकांवर घासून डोळ्यांवर लावणे
  • त्राटक करणे

असे वरील सर्व व्यायाम प्रकार हे (त्राटक वगळता प्रत्येकी 5 ते 10 वेळा करणे )

  • त्राटक करण्याची पद्धत :

प्रथम एक दिवा किंवा मेण बत्ती लावावी (तुपाचा दिवा असल्यास उत्तम). दिवा सरल डोळ्यांच्या समान रेषेत येईल असा ठेवणे. नंतर दिव्यापासून किमान एक ते दोन हात लांब सुखासनात बसणे. व दिव्याकडे डोळ्यांची पापणी न लावता एकटक बघणे. डोळ्यातून पाणी येण्यास सुरुवात झाली की डोळे शांतपणे मिटून थोडा वेळ डोळ्यांना विश्रांति देणे . नंतर दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवर  घासून डोळ्यांवर अलगद ठेवणे आणि नंतर डोळे हळुवारपणे उघडणे. ही सर्व क्रिया करतांना खोलीतील तीव्र लाइट बंद असावे किंवा कमी उजेडाच्या ठिकाणी हे त्राटक करावे.

विशेष आयुर्वेदिक व पंचकर्म  उपचार

सामान्य उपचार :

  • त्रिफळा चूर्ण (२५० मि. ग्रा.) + विषम मात्रेत तुप आणि मधासह सकाळ संध्याकाळ घेणे.
  • अर्धा चमचा च्यवनप्राश सकाळी उपाशी पोटी खाणे.

आयुर्वेद शास्त्रामध्ये विशेष अशा पंचकर्म चिकित्सा वर्णन केल्या आहेत ज्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय लाभ दायक आहेत.

पादाभ्यंग :  पाद म्हणजे पाय व त्यांना हळुवारपणे तेल चोळून जिरवणे म्हणजे पादाभ्यंग. तळव्यांवर  तेल जिरवणे ही एक आयुर्वेद दिनचर्याचा  एक भाग आहे. दोन्ही पायांच्या तळव्यांपासून दोन नाडी उगम पावतात ज्या नेत्रांच्या आरोग्य सांभाळतात. नित्य नियमाने पादाभ्यंग हे वात शमन करुन डोळ्यांचे आरोग्य सांभाळते.

नेत्र तर्पण : डोळ्यांभोवती उडीदाच्या कणकेची पारी करुन  त्यात औषद्धिसिद्ध घृत टाकणे आणि डोळ्यांची हालचाल करणे म्हणजे नेत्र तर्पन होय. तर्पन याचा शब्दशः अर्थ म्हणजे शांत करणे आणि  बल प्रदान करणे मतितार्थ . या प्रक्रियेमध्ये जे घृत वापरले जाते ते औषधी सिद्ध असून डोळ्यांमधील विविध अवयव जसे कृष्ण वर्तुळ, श्वेत मंडल (पांढरे बुब्बुळ), पक्ष्म मंडल, तारा मंडल इत्यादि विविध नेत्र पटल पर्यन्त पोहचून त्यांची शक्ति वाढवते आणि पोषण प्रदान करते.

रक्त मोक्षण: बर्‍याच नेत्र व्याधींमध्ये पित्त, रक्त ह्यांची एकत्रित किंवा वेगवेगळी दुष्टि करुन दोष उत्पन्न करतात. ते दूषित दोष  रक्त बाहेर काढण्यासाठी रक्तमोक्षण हा उपक्रम केला जातो. त्या करिता जलौका वापरणे हा उत्तम असा पर्याय ठरतो. जलौकवचरण हे दूषित दोष शोषून तिथे नव निर्मिती करणायस मदत करते.

नस्य:  नाकाद्वारे औषध प्रविष्ट करण्याच्या प्रक्रियेला नस्य म्हणतात. औषधी सिद्ध तुप हे नाकाद्वारे प्रविष्ट करुन ते मेंदू व नेत्राशी संलग्न असणार्‍या मज्जातंतू  व स्नायूंना बल प्रदान करते.  यामुळे वात दोष शमन होते व इंद्रिय जास्त कार्यक्षम होतात.

पंचकर्मांपैकी इतर कर्म जसे वमन, विरेचन आणि बस्ती हे सुद्धा डोळ्यांच्या व्याधींमध्ये दोष काल अवस्था अनुरुप उपयुक्त ठरतात.

*(वरील सर्व कर्म हे वैद्यकीय सल्ल्याने करणे आवश्यक आहे.)*

डोळ्यांसंबंधित विकारांसाठीचे  पथ्य आणि अपथ्य :

डोळ्यांच्या विरांकमध्ये पथ्य म्हणून शेवगा, आवळा, जीवंति शाक, पडवळ इत्यादि डोळ्यांकरीता हितकर आहे.

डोळ्यांच्या विरांकमध्ये अपथ्य म्हणून आंबवलेले पदार्थ, जास्त आंबट पदार्थ, अति मसालेदार पदार्थ, मद्यपान, धुम्रपान हे टाळावे.

*(वरील लेख मध्ये जे काही औषधी उपाय व पंचकर्म वर्णन केले आहेत ते सर्व माहितीकरिता दिलेले आहे. तरी कुठलेही औषध किंवा पंचकर्म उपचार करण्यापूर्वी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)*

नेत्र किंवा डोळ्यांच्या व्याधींसाठी आयुर्वेदिक आणि पंचकर्म चिकित्सा करिता आम्हाला संपर्क करु शकता www.ayurvidhiclinic.com किंवा मोबाइल 9511953471 आयुर्विधी क्लिनिक आयुर्वेदिक पंचकर्म केंद्र, ऑफिस नं 309,  पार्क प्लाझा बिझनेस सेंटर,  पोरवाल रोड, लोहगाव, पुणे 411047.

Read More

पथ्यकर आहार संल्पना आणि आयुर्वेद : भाग २

पथ्य आहार संकल्पना आणि आयुर्वेद : भाग २ 

मागील भागामद्धे आपण पोळी, वरण, भात यांबद्दल आपण सविस्तरपणे बघितलं. या भागात विविध फळ भाजी, पालेभाज्या त्यांच्या बनवण्याची साधारण कृती, विविध प्रकारच्या चटण्या  आणि त्यांचा पथ्य विचार बघूया .

भाजी:

दुधी भोपळा, पडवळ , भेंडी, दोडका,घोसाळे,गिलके, तोंडले,पांढरे वांगे,काकडी, नवलकोल, कोबी, फ्लॉवर, कोहळा, केळफुल,श्रवणघेवडा या भाज्या नित्य प्रकारे जेवणात घेऊ शकता.  

घेवडा, पावटा, शेवगा (शेवग्याची शेंग), गवार या भाजी सुद्धा बेताच्या प्रमाणात आहारात असू द्याव्या.

मग ह्याचं का असा पण प्रश्न येऊ शकतो. पहिले मुख्य कारण या सर्व भाज्या फळ भाजी या वर्गामध्ये मोडतात. वरील फळ भाज्या ह्या वनस्पतींना फळ स्वरुप उत्पन्न होतात. फळ सदृश असल्याने त्या त्रिदोष शामक, मल आणि मूत्र यांना अवरोध न करणार्‍या तसेच पचायला हलक्या असतात. अशा प्रकारे या सर्व भाज्या पथ्यकर  ठरतात.

भाजी बनवण्याची कृती:

भाजी करतांना त्यांना स्वच्छ धुवून चिरुन, साजूक तूप किंवा तेल मध्ये  जिरे, मोहरी, आलं- लसूण घालून, हळद, मीठ आणि लाल तिखटची फोडणी घालून मंद आचेवर शिजू द्यावी. गरम मसाला, विविध प्रकारच्या ग्रेवि यांचा वापर टाळावा.

पाले भाजी:

राजगिरा, साधा माठ, लाल माठ, चवळी, या भाजी चालतील. तसेच पालक, मेथी, शेपू इत्यादि भाजी कमी प्रमाणात चालतील.

वरील पैकी भाजी स्वच्छ धुवून, चिरुन , साजूक तूप किंवा तेल मध्ये  जिरे, मोहरी, आलं- लसूण घालून, हळद, मीठ आणि लाल तिखटची फोडणी घालून मंद आचेवर शिजू द्यावी.

असिडिटी, तसेच पोटात आग किंवा जळळ, घशात आंबट पानी किंवा पोटासंबंधी इतर कुठलेही आजार असताना टाळाव्या  किंवा  वैद्य सल्ल्यानुसार पालेभाजी आहारात समाविष्ट  कारव्या.

साधारण नियम:

भाजी करताना साधारण तूप किंवा तेलाची फोडणी द्यावी . हिरवी मिरची एवजी लाल तिखट कमी प्रमाणात घ्यावे. जास्त मसाले किंवा ग्रेवी, खूप सारण लावून किंवा हरभरा पीठ पेरून (बेसन लावून) भाज्या करु नये.

चटण्या:

साधारणपणे तीळ, जवस, खोबरे, शेंगदाणा किंवा कडीपत्ता  ह्यांपैकी कुठलीही एक कोरडी चटणी, जेवतांना तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता. प्रमाण एक किंवा दोन छोटे चमचे प्रमाणात घ्यावे. ज्या लोकांना कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांचे दुखणे आहे त्यांनी वरील चटण्या जेवणात समाविष्ट कराव्यात.

*(पित्ताचा त्रास असणार्‍या लोकांनी शेंगदाणा चटणी टाळावी आणि तिखटाचे प्रमाण कमी ठेवावे.)*

अशा प्रकारे या लेख मालिकेतील भागात आपण काही महत्वाचे पदार्थ बघितले.जेवणाच्या  ताटातील इतर पदार्थ क्रमशः ………..

Read More

पथ्यकर आहार संल्पना आणि आयुर्वेद : भाग १

कुठलाही व्याधी असताना किंवा व्याधी होऊ नये या भावनेने जर  तुम्ही कुठल्याही आयुर्वेद वैद्यकडे गेलात की ते तुम्हाला हमखास काही तर पथ्य आणि अपथ्य सांगतात. त्याच विषयी आपण या लेख मालिकेत बघणार आहोत. सर्वात आधी एक सामान्य लोकांमध्ये असणारा गैरसमज आज आपण पहिले बघू तो म्हणजे पथ्य आणि अपथ्य.

पथ्य : म्हणजे जे पदार्थ खायला चालतील असे खाद्य पदार्थ
अपथ्य : म्हणजे जे पदार्थ खायला चालणार नाही असे खाद्य पदार्थ

आता आपण पथ्य ही संकल्पना सविस्तर बघू या

पथ्य म्हणजे पथ किंवा मार्ग. मग हा मार्ग कोणता? असा आपल्याला प्रश्न पडणार . ज्या मार्गाने शरीरातील भाव पदार्थ अव्याहतपणे सर्व शरीरभर वहन होतात तो ! याला आयुर्वेदात स्रोतस असे म्हंटले जाते. म्हणजेच पथ्य हे शरीरातील भाव पदार्थ वहन करणार्‍या वाहिन्यांना यथा योग्य अशा स्तिथी मध्ये ठेवण्यास मदत करते किंवा त्यात अडथळा करत नाही. तर या उलट ते शरीरात अडथळा उत्पन्न करतात ते आहार घटक म्हणजे अपथ्य.

पथ्य संकल्पना ही देश, काल, प्रकृती, रुग्ण अवस्था, बल, सत्व, सत्म्य या सर्वांचा विचार करुन खूप विस्तृत अशी आहार पद्धती आहे. याच पथ्य संकल्पना संक्षिप्त आणि सर्व सामान्य अशा सामान्य पथ्य मध्ये बघूया.

पोळी / चपाती:

भारतीय आहाराचा सर्वात माहत्वाचा घटक म्हणजे पोळी किंवा चपाती. शक्यतोवर रोजच्या जेवणात गव्हाची पोळी असावी. त्याच गव्हाचा फुलका हा पचयाला पोळीपेक्षा हलका असतो. जर तुम्हाला मधुमेह किंवा डायबीटीस आहे किंवा वजन वाढायची काळजी वाटत असेल तर ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी हा उत्तम असा पर्याय आहे. ज्वारीची आणि बाजरी मध्ये फायबर किंवा तंतुमय जास्त असून मधुमेह-अंक (glycemic index) हा पण कमी असतो .   आयुर्वेदानुसार गहू, बाजरी, ज्वारी हे उत्तम पौष्टिक पदार्थ असून  ते बल्य, हाडांना मजबतू करणारे आहे. आणि नित्या सेवानिय म्हणजे रोजच्या आहारात असावे असे पदार्थ आहे.

भात:

दुसर्‍या क्रमांकर आहे सर्वात विवादीत पदार्थ, तो म्हणजे भात. खायचा की नाही ? कोणी पूर्णतः बंद करावा, चाला बघुया. खरतर भात हा आद्य किंवा प्रमुख भारतीय पदार्थ. पण चुकीच्या बनवायच्या व खाण्याच्या पद्धतीमुळे भात हा विवादीत घटक झाला आहे. सगळ्यात आधी भाताबद्दल काही सामान्य नियम बघु. भातासाठी तांदूळ निवडतांना तो शक्यतोवर तुमच्या देश म्हणजे भौगोलिक राहत असणार्‍या शेत जमिनीत पिकलेला असावा.  म्हणजे  जर तुम्ही भारतात आणि त्यातल्या-त्यात  महाराष्ट्रात राहत असणार तर इंद्रायणी,आंबेमोहर, बासमती, कोलम, जिरं कोलम हे तांदूळ तुम्ही खायला वापरु शकता. तांदूळ वापरत आणताना तो शक्यतोवर एक वर्ष जुना असवा.

भात शिजवताना पातेल्यात पानी घालून करावा, कूकरचा  वापर करुन नये.  उपरोक्त पद्धतीने बनवलेला भात हा दुपारच्या जेवणात खावा, रात्रीच्या जेवणात शक्यतोवर खाऊ नये. वजन जास्त असणारे व मधुमेही रुग्णांनी हा नियम काटेकोरपणे  पळावा. आयुर्वेदानुसार वरील पद्धतीने तयार केलेला भात हा उत्तम बृहण म्हणजे शरीरातील धातुना बल देणारा, पचायला लघु किंवा  हलके, पथ्यकर स्निग्ध अशा गुणांचा असतो.

वरण (डाळ)  :

रोज च्या जेवणात पातळ असे मूग, तूर किवा मसूर या पैकी एक कुठले तरी वरण घेऊ शकता. घट्ट असे डाट वरण शक्यतोवर टाळावे. वरण हे साधे जास्त फोडणी घातलेले नसावे.  फोडणी घालायचीच असल्यास तूप, जिरे, कडीपत्ता आणि थोडं चिपुरते लसूण कळी घालू शकता.  फोडणीला गरम मसाला, टमटार , कांदा सहसा वापरु नये, त्यमुळे आम्लपित्त होण्याची डाट शक्यता असते .  

अशा प्रकारे या लेख मालिकेतील भागात आपण काही महत्वाचे पदार्थ बघितले.जेवणाच्या  ताटातील इतर पदार्थ क्रमशः ………..

Read More

सुवर्ण प्राशन : आयुर्वेदाची अनोखी परंपरा

आयुर्वेद हा जगाला लाभलेला एक औषधी वनस्पति व चिकित्सा शास्त्राचा अनमोल ठेवा आहे. ह्या ज्ञानाचा अथांग सागरात, अनेक असे मौल्यवान अशा औषधी वनस्पतींचा आणि काही अशा पद्धती सांगितल्या आहेत त्या इतर कुठल्याही औषधी शास्त्रमध्ये उल्लेख नाही. पूर्वी ह्या पद्धती एक आयुर्वेदिक चर्या (परिचर्या) म्हणून सांगितल्या गेल्या ज्या पुढे जाऊन ज्यांचे परंपरेत रूपांतर झाले. सुवर्ण प्राशन हे त्यामधीलच  एक. सुवर्ण प्राशनाचा प्रामुख्याने उल्लेख भारतीय संकृती मधील सोळा संस्कारांमध्ये मिळतो. सोळा संस्कार हे प्रामुख्याने बालकच्या जिवनातिल प्रत्येक टप्याची (वाढीची) पूर्णता  दर्शवणारे प्रतिकात्मक मैलाचा दगड.  ह्या संस्कारांची रचना सुरुवात ही, शिशूच्या गर्भधारणेपूर्वी पासून, गर्भावस्था,जन्म व त्या  नंतरच्या आयुष्यात संगीतल्या असते.

सुवर्ण प्राशनचा  प्रामुख्याने उल्लेख “कौमारभृत्य तंत्र “ वरील प्रधान ग्रंथ असणार्‍या काश्याप संहिता मध्ये मिळतो. आचार्य कश्याप हे बाल चिकित्सक, काश्याप संहितेत त्यांनी लहान मुलांच्या आरोग्य विषयक तक्रारी व त्यांची चिकित्सा सविस्तर वर्णन केली आहे.

आचार्य कश्याप, सुवर्ण प्राशनचा उल्लेख करतांना म्हणतात :

सुवर्णप्राशनं हि एतत् मेधाग्निबलवर्धनम्।

आयुष्यं मङ्गलं पुण्यं वॄष्यं वर्ण्यं ग्रहापहम्॥

मासात् परममेधावी व्याधिभिर्नच धष्यते।

षडभिर्मासैः श्रुतधरः सुवर्णप्राशनाद् भवेत्॥

अर्थ : सुवर्ण प्राशन हे मेधा (बुद्धी), अग्नि (पचन शक्ति),  बल (शारीरिक बल) वर्धन करणारे आहे . तसेच वर्ण, आयुष्य वाढवणारे तसेच मंगलकारक व पुण्यप्रद (हितकारक)असून ग्रहबाधा ( व्याधींच्या संसर्ग) पासून संरक्षण करणारे व व्याधी प्रतिकार शक्ति वाढवणारे आहे.

सुवर्ण प्राशन एवढे महत्वाचे का?

सामान्य भाषेत सांगायचे झाले तर सुवर्ण प्राशन हे सद्य परिस्थितील लसीकरणा सारखे आहे.  या मधील सुवर्ण भस्म, घृत , मध आणि काही विशिष्ठ वनस्पति लहान मुलांना आरोग्य रक्षक ठरते.

सुवर्णच का ?

भारत किंवा हिंदू संस्कृती मध्ये सोने ह्याला अनन्या साधारण महत्व आहे. सोन्याचा संबंध देव, ऐश्वर्य, समृद्धि सोबत जोडला जातो. सोने ह्या धातू मध्ये एक प्रकारचे संरक्षक तत्व असते संशोधनात आढळून आले आहे. तसेच ते रसायन, आयुष्यवर्धक, वर्ण सुधाकर, मस्तिष्क म्हणजेच मेंदूला चालना देणारे असून स्मरणशक्ति वाढवणारे आहे.

सुवर्ण प्राशन मधील घटक द्रव्य:

सुवर्ण भस्म, घृत , मध, तसेच काही ठराविक औषधी द्रव्य हे सुवर्ण प्राशनचे प्रमुख घटक आहेत.  त्यांचे गुण धर्म खालील प्रमाणे आहे :

सुवर्ण भस्म:

सुवर्ण हे आयुर्वेद शास्त्रात एक रसायन म्हणून ओळखले जाते. सुवर्ण भस्म हे  स्निग्ध, तिक्त-मधुर रस प्रधान असून त्रिदोष शामक, शीत वीर्य, प्रज्ञा-बल-स्मृति स्वर-कांति ह्यांना वाढवणारे,  बृहण असून नेत्रास हितकर आहे. सुवर्ण हे मज्जा-तंतु व मज्जा-संस्थान या वरील ताण उत्तम प्रकारे कमी करणारे आहे.

घृत/ तूप:

घृत/ तूप वात आणि पित्त ह्यांचे शमन करणारे. शीत विर्यात्मक, वायस्थापक, बुद्धि, स्मृति, बल स्वर ह्यांना हितावह आहे. तसेच तूप हे स्वतः चे गुण अबाधित ठेऊन त्याबरोबर असणार्‍या औषधी द्रव्यांचे गुण वर्धन करणारे आहे.

मध: 

मध हे उत्तम असे गुण वाहक आहे. लहान मुलांचे कफाचे आजार तसेच मेदाचे लेखन करणारे आहे. मध हे औषधाचे उत्तम रित्या पचन करण्यास मदत करतात. मध हे शरीरात उत्तम प्रकारे शोषले जाते, त्यामुळे त्यामुळे त्या सोबत दिलेले औषध देखील शरीरात लवकर शोषले जाण्यास मदत करते.

वनस्पति :

सुवर्ण प्राशन बनवतांना वचा, शंखपुष्पि, ब्राह्मी अशा विविध औषधी वनस्पति वापरण्यात येतात. ह्या वनस्पति मज्जातंतु व मज्जा संस्थानला हितावह असून त्यांचे पोषण करणारे आहे. हे औषधी द्रव्य सुवर्णाचे शरीरात होणारे पचन करण्यास मदतकर आहेत.

सुवर्ण प्राशन पुष्य नक्षत्रावर का करतात?

पुष्य नक्षत्र हे २७ नक्षत्र मंडळातील एक नक्षत्र. पुष्य शब्दाची निरुक्ती ही “पुष् “  ह्या संस्कृत धातू पासून झाली आहे, ज्याचा अर्थ पुष्टी-करणारा असा आहे. ह्या नक्षत्र वर केले जाणारे कार्य सफल आणि सुफल करणारे आहे. बाळाला दिला जाणारा सुवर्ण प्राशन त्याला पुष्टी करो म्हणून पुष्य नक्षत्र.

वयो गट :

0 ते १६ या वयोवर्षातील बालकांसाठी उपयुक्त .

सुवर्ण प्राशनचे फायदे :

  • प्रतिकार शक्ति वाढवते
  • पचन शक्ति व आतड्यांची ताकद वाढवते.
  • स्मरणशक्ति व एकाग्रता वाढवण्यास उपयुक्त
  • वारंवार होणार्‍या आजारपणांपासून बचाव करते.
  • त्वचेचा नितळ  बनवते  व केस सुधारते .

सुवर्ण प्राशन कधी सुरू करावे?

सुवर्ण प्राशन हे कुठल्याही वयो गटातील मुलांना देऊ शकता, जरी पूर्वी दिला असेल किंवा नाही. उत्तम व चांगल्या परिणामांसाठी नियमित देणे आवश्यक आहे.

कधी द्यावे?

सुवर्ण प्राशन हे शक्यतोवर सकाळी अनोशापोटी द्यावे.

सुवर्ण प्राशन दिल्यावर किमान अर्धा ते पाऊण तास बाळाला काही खाऊ घालू नये

सुवर्ण प्राशन डॉक्टर बाठे ह्यांच्या आयुर्विधी चिकित्सलय पोरवाल रोडलोहगाव, पुणे येथे हे नियमित पणे दर महिन्याच्या पुष्य नक्षत्रावर केले जाते.

सन २०२३ मध्ये येणार्‍या सुवर्ण प्राशनचा तारीख पुढील प्रमाणे आहेत :

 

Read More