आयुर्वेद आणि पर्यावरण : यां बद्दल हे माहीत असावं

आयुर्वेद हे जीवनाचे शस्त्र आहे, यामध्ये जीवन सुखमय कसे जगावे हे संगितले आहे. आणि हे शरीर सुखमय राहण्याचे एक कारण आपल्या भोवतीचे हे पर्यावरण देखील आहे. आयुर्वेद शस्त्राचे सिद्धान्त हे सृष्टी क्रम व पंचमहाभूत ह्यांचा अभ्यास करून मांडले गेले आहेत.  आयुर्वेदाचे मूलभूत सिद्धान्त हे पंचमहाभूतावर आधारित असून सृष्टीची  उत्पत्ति करण्यास व मानव शरीर निर्माण करतात कारणीभूत ठरतात . आकाश, वायु, तेज, जल आणि पृथ्वी हे क्रमाने पंच महाभूतांची नवे.

ते कसे उत्पन्न होऊन पुढे परिणामन होतात ह्याचे छान वर्णन तैत्तिरीय उपनिषदात केले आहे:

तस्माद्वा एतस्मादात्मानं आकाशः सम्भूतः। आकाशाद्वायु:। वायोरग्निः।अग्नेरापः। अद्भ्यः पृथिवी। पृथिव्या ओषधयः। ओषधीभोन्नम्। अन्नात्पुरुषः। स वा एष पुरुषोऽन्नरसमयः।

अर्थ: प्रथम आकाश हा जागा किंवा पोकळी निर्माण करतो. तयार झालेल्या पोकळीत वायु हा अव्याहत मुक्त  पणे विचरण करू लागतो. वायुच्या घर्षनातून उष्मा वाढून तेज तत्व उत्पन्न होते. तेजाचा उष्मा शांत झाल्यावर त्यातून जल निर्माण होते. तयार जल गोठले जाऊन त्यातून पृथ्वी तयार होते. पृथ्वी अनेक ओषधी व  वनस्पति उत्पन्न करते. ह्या तयार वनस्पतींच्या रसावर मानव व इतर सजीव सृष्टी निर्माण व पोषित होते.

तसेच हे पंच महाभूत शरीरातील भाव पदार्थ देखील  निर्माण करतात. आकाश आणि  वायु मिळून वात दोषाची उत्पत्ति करतात. तेज आणि जल महाभूत हे दोघे मिळून पित्त दोषाचे संघटन तयार करते. जल आणि पृथ्वी हे कफ दोष उत्पन्न करतो.

पुरुषोऽयं लोकसम्मितः।

सर्वं द्रव्यं पांचभौतिकं अस्मिन् अर्थे।

म्हणजेच बघायला गेले सृष्टीतील महाभूत हे नुसतं पार्थिव सृष्टी व पर्यावरण करत नाही तर सजीव सृष्टी व त्यांचे पोषण देखील करते. अशा प्रकारे हे दोघेही  एकमेकांवर अवलंबून असतात.

पर्यावरण जपणे आणि त्याचे संवर्धन करणे हे महत्वाचे आहे. कारण हेच महाभूत शरीर आणि पर्यावरण ह्यातील समतोल व बिघाड ह्याला करणीभूत असतात. त्यामुळे पर्यावरण सरंक्षण हे मानव कल्याणसाठी आवश्यक आहे.

त्यामुळे या पर्यावरण दिवशी आपण आपले पर्यावरणला जपणे व त्यातून आपले आरोग्य जपण्यास एक पाऊल पुढे उचलूया.

धन्यवाद

Read More

सुवर्ण प्राशन : आयुर्वेदाची अनोखी परंपरा

आयुर्वेद हा जगाला लाभलेला एक औषधी वनस्पति व चिकित्सा शास्त्राचा अनमोल ठेवा आहे. ह्या ज्ञानाचा अथांग सागरात, अनेक असे मौल्यवान अशा औषधी वनस्पतींचा आणि काही अशा पद्धती सांगितल्या आहेत त्या इतर कुठल्याही औषधी शास्त्रमध्ये उल्लेख नाही. पूर्वी ह्या पद्धती एक आयुर्वेदिक चर्या (परिचर्या) म्हणून सांगितल्या गेल्या ज्या पुढे जाऊन ज्यांचे परंपरेत रूपांतर झाले. सुवर्ण प्राशन हे त्यामधीलच  एक. सुवर्ण प्राशनाचा प्रामुख्याने उल्लेख भारतीय संकृती मधील सोळा संस्कारांमध्ये मिळतो. सोळा संस्कार हे प्रामुख्याने बालकच्या जिवनातिल प्रत्येक टप्याची (वाढीची) पूर्णता  दर्शवणारे प्रतिकात्मक मैलाचा दगड.  ह्या संस्कारांची रचना सुरुवात ही, शिशूच्या गर्भधारणेपूर्वी पासून, गर्भावस्था,जन्म व त्या  नंतरच्या आयुष्यात संगीतल्या असते.

सुवर्ण प्राशनचा  प्रामुख्याने उल्लेख “कौमारभृत्य तंत्र “ वरील प्रधान ग्रंथ असणार्‍या काश्याप संहिता मध्ये मिळतो. आचार्य कश्याप हे बाल चिकित्सक, काश्याप संहितेत त्यांनी लहान मुलांच्या आरोग्य विषयक तक्रारी व त्यांची चिकित्सा सविस्तर वर्णन केली आहे.

आचार्य कश्याप, सुवर्ण प्राशनचा उल्लेख करतांना म्हणतात :

सुवर्णप्राशनं हि एतत् मेधाग्निबलवर्धनम्।

आयुष्यं मङ्गलं पुण्यं वॄष्यं वर्ण्यं ग्रहापहम्॥

मासात् परममेधावी व्याधिभिर्नच धष्यते।

षडभिर्मासैः श्रुतधरः सुवर्णप्राशनाद् भवेत्॥

अर्थ : सुवर्ण प्राशन हे मेधा (बुद्धी), अग्नि (पचन शक्ति),  बल (शारीरिक बल) वर्धन करणारे आहे . तसेच वर्ण, आयुष्य वाढवणारे तसेच मंगलकारक व पुण्यप्रद (हितकारक)असून ग्रहबाधा ( व्याधींच्या संसर्ग) पासून संरक्षण करणारे व व्याधी प्रतिकार शक्ति वाढवणारे आहे.

सुवर्ण प्राशन एवढे महत्वाचे का?

सामान्य भाषेत सांगायचे झाले तर सुवर्ण प्राशन हे सद्य परिस्थितील लसीकरणा सारखे आहे.  या मधील सुवर्ण भस्म, घृत , मध आणि काही विशिष्ठ वनस्पति लहान मुलांना आरोग्य रक्षक ठरते.

सुवर्णच का ?

भारत किंवा हिंदू संस्कृती मध्ये सोने ह्याला अनन्या साधारण महत्व आहे. सोन्याचा संबंध देव, ऐश्वर्य, समृद्धि सोबत जोडला जातो. सोने ह्या धातू मध्ये एक प्रकारचे संरक्षक तत्व असते संशोधनात आढळून आले आहे. तसेच ते रसायन, आयुष्यवर्धक, वर्ण सुधाकर, मस्तिष्क म्हणजेच मेंदूला चालना देणारे असून स्मरणशक्ति वाढवणारे आहे.

सुवर्ण प्राशन मधील घटक द्रव्य:

सुवर्ण भस्म, घृत , मध, तसेच काही ठराविक औषधी द्रव्य हे सुवर्ण प्राशनचे प्रमुख घटक आहेत.  त्यांचे गुण धर्म खालील प्रमाणे आहे :

सुवर्ण भस्म:

सुवर्ण हे आयुर्वेद शास्त्रात एक रसायन म्हणून ओळखले जाते. सुवर्ण भस्म हे  स्निग्ध, तिक्त-मधुर रस प्रधान असून त्रिदोष शामक, शीत वीर्य, प्रज्ञा-बल-स्मृति स्वर-कांति ह्यांना वाढवणारे,  बृहण असून नेत्रास हितकर आहे. सुवर्ण हे मज्जा-तंतु व मज्जा-संस्थान या वरील ताण उत्तम प्रकारे कमी करणारे आहे.

घृत/ तूप:

घृत/ तूप वात आणि पित्त ह्यांचे शमन करणारे. शीत विर्यात्मक, वायस्थापक, बुद्धि, स्मृति, बल स्वर ह्यांना हितावह आहे. तसेच तूप हे स्वतः चे गुण अबाधित ठेऊन त्याबरोबर असणार्‍या औषधी द्रव्यांचे गुण वर्धन करणारे आहे.

मध: 

मध हे उत्तम असे गुण वाहक आहे. लहान मुलांचे कफाचे आजार तसेच मेदाचे लेखन करणारे आहे. मध हे औषधाचे उत्तम रित्या पचन करण्यास मदत करतात. मध हे शरीरात उत्तम प्रकारे शोषले जाते, त्यामुळे त्यामुळे त्या सोबत दिलेले औषध देखील शरीरात लवकर शोषले जाण्यास मदत करते.

वनस्पति :

सुवर्ण प्राशन बनवतांना वचा, शंखपुष्पि, ब्राह्मी अशा विविध औषधी वनस्पति वापरण्यात येतात. ह्या वनस्पति मज्जातंतु व मज्जा संस्थानला हितावह असून त्यांचे पोषण करणारे आहे. हे औषधी द्रव्य सुवर्णाचे शरीरात होणारे पचन करण्यास मदतकर आहेत.

सुवर्ण प्राशन पुष्य नक्षत्रावर का करतात?

पुष्य नक्षत्र हे २७ नक्षत्र मंडळातील एक नक्षत्र. पुष्य शब्दाची निरुक्ती ही “पुष् “  ह्या संस्कृत धातू पासून झाली आहे, ज्याचा अर्थ पुष्टी-करणारा असा आहे. ह्या नक्षत्र वर केले जाणारे कार्य सफल आणि सुफल करणारे आहे. बाळाला दिला जाणारा सुवर्ण प्राशन त्याला पुष्टी करो म्हणून पुष्य नक्षत्र.

वयो गट :

0 ते १६ या वयोवर्षातील बालकांसाठी उपयुक्त .

सुवर्ण प्राशनचे फायदे :

प्रतिकार शक्ति वाढवते

पचन शक्ति व आतड्यांची ताकद वाढवते.

स्मरणशक्ति व एकाग्रता वाढवण्यास उपयुक्त

वारंवार होणार्‍या आजारपणांपासून बचाव करते.

त्वचेचा नितळ  बनवते  व केस सुधारते .

सुवर्ण प्राशन कधी सुरू करावे?

सुवर्ण प्राशन हे कुठल्याही वयो गटातील मुलांना देऊ शकता, जरी पूर्वी दिला असेल किंवा नाही. उत्तम व चांगल्या परिणामांसाठी नियमित देणे आवश्यक आहे.

कधी द्यावे?

सुवर्ण प्राशन हे शक्यतोवर सकाळी अनोशापोटी द्यावे.

सुवर्ण प्राशन दिल्यावर किमान अर्धा ते पाऊण तास बाळाला काही खाऊ घालू नये

सुवर्ण प्राशन डॉक्टर बाठे ह्यांच्या आयुर्विधी चिकित्सलय पोरवाल रोडलोहगाव, पुणे येथे हे नियमित पणे दर महिन्याच्या पुष्य नक्षत्रावर केले जाते.

सन २०२३ मध्ये येणार्‍या सुवर्ण प्राशनचा तारीख पुढील प्रमाणे आहेत :

Read More