आता पर्यन्त पहिल्या ३ लेखांमध्ये  आपण अनेक खाद्य पदार्थ आणि त्यांचे खाण्याचे सामान्य नियम पथ्य आणि बनवण्याची पद्धत आपण बघितले आहे. तरी या शेवटचा लेखामद्धे आपण नाश्ता पदार्थ, फळे, दुग्ध आणि दुग्ध पदार्थ यांचे सामान्य पथ्य बघूया, तसेच कुठले टाळण्यासारखे पदार्थ तेही पाहणार आहोत.

सकाळचा  नाश्ता व संध्याकाळी साठी  खाण्याचे  फराळाचे पदार्थ :

उपमा, शिरा, पोहे ( असिडिटी नसल्यास), राजगिरा लाडू, सुके मेवाचा लाडू,  किंवा साळीच्या लाहयांचा चिवडा, भाजेलेल माखणे तूप जिरे मीठ सह परतून खाण्यास चालतील.

इडली, डोसा, ढोकळा हे पदार्थ नाश्ता साथी शक्यतोवर टाळावे.

फळे :

पुढील फळे हे आयुर्वेद वैद्यांना सर्व सामान्यपणे मान्य आहेत; अंजीर, मोसंबी, डाळिंब, आवळा, खजूर, कलिंगड, खरबूज.

सर्दी किंवा कफचा त्रास नसल्यास केळी, पेरु, सीताफळ,चिकू हे खाऊ शकता.

तसेच ऋतुमान अनूसार येणारे फळ जसे जांभूळ, सीताफळ, पेरु, आंबे, स्ट्रॉबेरी या फळांचे  सेवन प्रमाणात खाणे आयुर्वेदमत मान्य आहे.

दूध आणि दुग्ध पदार्थ :

रोज पिण्यासाठी गाईचे किंवा म्हशीचे दूध चालेल. आठवड्यातून एक किंवा दोन वेळा घरचे बनवलेले ताजे दही जेवतांना चालेल. तसेच ताज्या दह्याचे ताक चालेल.

रोजच्या जेवणात नियमित पणे तूप हे असावे. साधारण एक वेळच्या जेवणात एक ते दोन चमचे तूप असू द्यावे.

पुढील पदार्थ पूर्णतः टाळावे:

सर्व प्रकारचे बेकरी पदार्थ जसे बिस्किट, ब्रेड, पिझ्झा बर्गर, बाहेरचे फरसान, पॅक चिप्स, अति तळलेले पदार्थ, शितपेय, शिळे पदार्थ इत्यादि.

 अशा प्रकारे सोपे आणि सरळ रोजचे सामान्यतः सहजरित्या सर्वांना चालणारे पथ्य आयुर्वेदमत अनुसार वर्णन केले आहे. हे सर्व सामान्य आहे , व्याधी व अवस्था यांच्यानुसार पथ्य मध्ये बदल राहू शकतो.

तरी  आपणास आहार आणि आरोग्य विषयक  वैयक्तिक आरोग्य सल्ला घ्यायचा असल्यास आम्हाला संपर्क करा.

संपर्क साठी आमच्या संकेत स्थळावर भेटद्या www.ayurvidhiclinic.com किंवा आम्हाला संपर्क करा 9511953471 या मोबाइल क्रमांकावर .