चेहर्‍यावरील मुरुम आणि पुटकळ्यांसाठी आयुर्वेदिक उपचार

चेहरा हा सौंदर्याचा एक प्रतीक आणि अभिव्यक्तीचं स्थान आहे. चेहरा तुमचे आरोग्य आणि पाचन तंत्र याचा देखील समर्पक असा विश्लेषण करुन देणारा आहे. त्यामुळे कुठलाही आजार झाल्यावर त्याचे पडसाद हे चेहर्‍यावर दिसून येतात. जसे की थकवा असल्यास चेहराम्लान दिसतो.  त्यमुळे चेहर्‍यवार कुठलेही डाग किंवा मुरुम पुटकळया हा लोकांना काळजीचा विषय होतो. कारण त्यामुळे त्यांना कुठे तरी आत्मविश्वास कमी झालेला वाटतो.  आणि प्रत्येक व्यक्तिला आयुष्यात कधी तरी मुरुम पुटकूळ्या यांनी भेदावलेले असते.

मुरुम किंवा पुटकूळ्या प्रामुख्याने पौगंडावस्थेत चेर्‍यावर येतात आणि कालांतराने त्यांचे प्रमाण कमी होते. पण काही चुकीच्या खान-पान च्या सवयींमुळे त्यांचे प्रमाण कमी न होता वाढते व त्यांचे एक त्वचा विकारात रूपांतर होते. आधुनिक औषध शस्त्रानुसार त्यावर काही अॅंटीबायोटिक्स आणि आणि चेहर्‍याला लावला क्रीम सांगितल्या जातात; ज्यांचा ठराविक काळपुरता परिणाम दिसून येतो. मात्र आयुर्वेदानुसार  मुरुम किंवा पुटकूळ्या यांची चिकित्सा करतांना सर्वांगीण गोष्टींचा विचार करुन केली जाते. या लेखामध्ये आपण मुरुम आणि  पुटकूळ्या उत्पन्न होण्याची कारणे, त्यांचे आयुर्वेदिक आणि पंचकर्म उपचार, तसेच योग्य असा आहार आपण बघणार आहोत.

 परिचय :

मुरुम आणि  पुटकूळ्या या साधारणपणे पौगंडावस्थेत चेर्‍यावर येण्यास सुरुवात होते  आणि कालांतराने त्यांचे प्रमाण कमी होते. काही अवस्थेत यावर योग्य असे औषध उपचार घ्यावे लागतात. हे प्रामुख्याने त्वचाविकार असण्याची शक्यता असते.  प्रौढावस्थेत याचे करणे हॉर्मोन्स, मानसिक ताण  आणि त्वचेची अयोग्य काळजी न घेणे यामुळे जास्त प्रमाणात होतात.

आयुर्वेदिक मत :

आधी सांगितल्या प्रमाणे, चेहरा तुमचे आरोग्य आणि पाचन तंत्र याचा देखील समर्पक असा विश्लेषण करुन देणारा आहे. त्यामुळे कुठलाही आजार झाल्यावर त्याचे पडसाद हे चेहर्‍यावर दिसून येतात.  याचे कारण असे की चेहरा हा रस, रक्त, मांस आणि शुक्र धातु यांचे स्थान आहे. आणि याच धातूंमध्ये दोष म्हणजे वात , पित्त आणि कफ यांचा प्रादुर्भाव वाढला की मुरूम आणि पुटकुळ्या निर्माण होतात.

 

चेहर्‍यावरील मुरुम आणि पुटकळ्या येण्याची कारणे :

  • होर्मोन्स मध्ये होणारे बदल
  • पोटाचे विकार
  • पाचन तंत्रातील बिघाड
  • चिरकाळ असणारी अॅसिडीटी
  • अपुरी झोप
  • बाहेरचे आणि अयोग्य खाद्य पदार्थ
  • त्वचेची काळजी न घेणे

इत्यादि सर्व करणे हे चेहर्‍यावरील मुरुम आणि पुटकळ्या येण्यासाठी करणीभूत ठरतात.

 

मुरुम आणि पुटकुळ्या यांचे आयुर्वेदिक निदान :

  1. युवान पीडिका
  2. मुख दूषिका
  3. क्षुद्र कुष्ठ
  4. रक्तदुष्टि

मुरुम आणि पुटकुळ्या साठी असे काही आयुर्वेदिक निदान करतांना येतात.

मुरुम आणि पुटकुळ्या साठी आयुर्वेदिक चिकित्सा:

कुठल्याही व्याधीची चिकित्सा करतांना त्याचा सर्वांगीण विचार करावा हे आयुर्वेद शास्त्राची चिकित्सा पद्धती आहे. ही चिकित्सा पद्धत मुरुम आणि पुटकुळ्या साठी सुध्दा लागू आहे. नुसतं चेहर्‍यावर क्रिम लावून किंवा लेप लावणे ही मुरुम आणि पुटकुळ्या साठी चिकित्सा नाही. तर योग्य निदान करुन आयुर्वेदिक औषधे सोबतच पंचकर्म उपचार, लेप आणि योग्य आहार- विहार अशी मुरुम आणि पुटकुळ्यासाठी संपूर्ण आयुर्वेदिक चिकित्सा अवलंबली जाते.

मुरुम आणि पुटकुळ्या साठी आयुर्वेदिक औषधे:

सर्व सामान्य पणे लागू पडतील अशी औषधे आम्ही सांगत आहोत, (तरी कृपया तज्ञ आयुर्वेदिक डोक्टरांचा सल्ला घ्यावा)

  1. लघुमंजिष्ठादी काढा 10 मि.लि. समभाग पाण्यासह दोन्ही वेळा जेवणानंतर
  2. सिरप साफी 10 मि.लि. समभाग पाण्यासह दोन्ही वेळा जेवणानंतर
  3. सरिवादी वटी 250 मि. ग्राम दिवसातून 2 वेळा
  4. त्रिफळा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यासह (कोष्ठानुसार )

 मुरुम आणि पुटकुळ्या साठी आयुर्वेदिक बाह्य लेप चिकित्सा :

सर्व सामान्य पणे लागू पडतील अशी लेपऔषधे आम्ही सांगत आहोत, (तरी कृपया तज्ञ आयुर्वेदिक डोक्टरांचा सल्ला घ्यावा)

  1. घरघुती साधा सोपा लेप: हळद पावडर + निंब पान चूर्ण + गुलाब पाकळी चूर्ण + मुलतानी माती सर्व समभाग घेणे. आणि आवश्यक तेवढे चूर्ण घेऊन पाणी किंवा गुलाब पाण्यात मिसळून त्याचा लेप करणे.
  2. रजनी लेप
  3. रक्त चन्दनादी लेप

मुरुम आणि पुटकुळ्यासाठी पंचकर्म उपचार :

वमन हे आमाशय मधील सर्व विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते. त्यामुळे रस धातूची निर्मिती आणि कार्य सुधारते. तसेच शरीरात साठलेला अतिरिक्त कफ जो की मुरुम आणि पुटकुळ्या निर्माण करण्यास करणीभूत ठरतो.

विरेचन ही जठर आणि आतड्यांमध्ये  सर्व विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते. त्यामुळे रक्त धातूची निर्मिती आणि कार्य सुधारते. तसेच शरीरात साठलेला अतिरिक्त पित्त बाहेर काढते जे  की मुरुम आणि पुटकुळ्यामध्ये पु किंवा लसीका स्त्राव  निर्माण करण्यास करणीभूत ठरतात.

रक्तमोक्षण हे शरीरातून दूषित रक्त बाहेर काढते. या साठी जलौका नामक एक प्राणी वापरला जातो जो विषारी दूषित रक्त शोषून घेऊन वारंवार होणार्‍या मुरुम आणि पुटकुळ्या निर्मिती वर आळा घालते. आणि त्वचेचे आरोग्य सुधारते.

मुरुम आणि पुटकुळ्या कमी करण्यासाठी योग्य आहार  उपचार:

सुंदर आणि नितळ त्वचा असण्यासाठी उत्तम असा सकस आहार असणे आवश्यक आहे, त्यात विशेषतः सर्व ताजी फळे आणि भाज्या योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे. आणि सर्व आहार हा तुमच्या प्रकृती, अग्नि आणि वय यांचा संपूर्ण  विचार करुन  घ्यावा. यामध्ये तूप असणे तर आवश्यक आहेच.

अधिक माहितीसाठी आमचे पूर्वीचे पथ्यकर आहार संकल्पना आणि आयुर्वेद : भाग १ ते ४ ही लेख मालिका आवर्जून वाचा।

  1. https://www.ayurvidhiclinic.com/%e0%a4%aa%e0%a4%a5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%86/ 
  2. https://www.ayurvidhiclinic.com/%e0%a4%aa%e0%a4%a5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%86-2/
  3. https://www.ayurvidhiclinic.com/%e0%a4%aa%e0%a4%a5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%86-3/
  4. https://www.ayurvidhiclinic.com/%e0%a4%aa%e0%a4%a5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%86-4/

 निष्कर्ष :

आयुर्वेद औषध उपचारांनी मुरुम आणि पुटकुळ्या यांना छानपणे घालवता येते. आयुर्वेद उपचार हे पुर्णपणे नैसर्गिक आणि उपद्रव रहित आहेत. त्यामुळे चिंतेची कुठलीही बाब नाही.

आम्ही आमच्या आयुर्विधी क्लिनिक मध्ये अनेक रुग्णांना मुरुम आणि पुटकुळ्या वर पृर्णपणे आयुर्वेदिक आणि पंचकर्म उपचार देऊन बरे केले आहे.

आमचा पत्ता :

आयुर्विधी क्लिनिक – आयुर्वेद पंचकर्म केंद्र , ऑफिस नं 309, तिसरा मजला, पार्क प्लाझा बिझनेस सेंटर , पोरवाल रोड, लोहगाव, पुणे 411047 .

Read More

आम्लपित्त (एसिडिटी) : कारणे, लक्षणे आणि आयुर्वेद पंचकर्म उपचार

आसिडिटी किंवा आम्लपित्त ही आजच्या जगात बर्‍याच लोकांना भेडसावणारी एक सर्व सामान्य व्यथा झाली आहे. बरेच लोक वेगवेगळे घरघुती उपाय करतात किंवा पित्त कमी करणार्‍या गोळ्या (antacid) घेतात. पण त्याचा काही विशेष फरक दिसत नाही. पण हे गोळ्या खाऊन आम्लपित्त कमी करणे जर बर्‍याच काल पर्यन्त तसेच सुरु  राहिले तर मग त्याचे दुष्परिणाम मात्र कालांतराने दिसून येतात. आयुर्वेद मात्र आम्लपित्तकडे चिकित्सा दृष्टीने सर्व बाजूने वियचार करतो.  जसे त्याचे हेतु, आहार, विहार, आणि औषधोपचार. या लेखामध्ये आपण या सर्व बाबींना जाणून घेऊ या.

एसिडिटी आणि आयुर्वेदिकमत :

आम्लपित्त हे असिडिटी साठी केल्या जाणारे सर्व सामान्य निदान आहे. आम्लपित्त  या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. आम्ल म्हणजे आंबट  रसाने युक्त किवा विकृत झालेले पित्त.  हे विकृत पित्त स्वतःच्या प्रकृत गुण आणि कर्मांचा त्याग केल्यामुळे विविध तक्रारी निर्माण करतात.

आम्लपित्ताची सामान्य लक्षणे :

  • पोटात आग किंवा जळजळ
  • छातीत आग किंवा जळजळ
  • अपचन
  • मळमळ
  • क्वचित उलटीचा त्रास होणे
  • डोक दुखणे
  • गरगल्या सारखे वाटणे

अम्लपित्ताचे उपद्रव :

आम्लपित्ताची उपेक्षा केल्यास  म्हणजे योग्यवेळी उपचार न केल्यास पुढील तक्रारी उद्भवू शकतात;

  • पोटाचे गंभीर आजार
  • पोटाचे अल्सर किंवा आताड्यांना छिद्र पडणे
  • हाड कमकुवत होणे
  • सांधे दुखी
  • डोक्यात कोंडा होणे
  • केस गळणे

अम्लपित्ताचे सामान्य हेतु (आयुर्वेद मते ):

खाण्याच्या चुकीच्या सवयी

वेळेवर जेवण न करणे

वेळ उलटून गेलयवर जेवण करणे (उशिरा जेवणे )

आंबट किंवा आंबवलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाणे

मद्यपान

पोटात आम संचिती

मानसिक ताण आणि तनाव

उष्ण वातावरणमध्ये काम करणे इत्यादि

 

आम्लपित्त टाळण्यासाठी काही आयुर्वेद तिल सामान्य उपाय:

पथ्य किंवा आहारीय बदल :

 

  1. जेवणाच्या वेळा नियमित करणे : वेळेवर भुक लागल्यावर जेवण करणे हा अम्लपित्त टाळण्याचा उत्तम उपाय आहे. आम्लपित्ताचे मूळ हे जठराग्नीच्या वैषम्यतून असल्याकारणाने वेळेवर जेवण केल्याने वात प्रकोप कमी होते, तसेच पाचक रसांचे स्रवण योग्य रीतीने होण्यास मदत करते.
  2. अनारोग्यदायी पदार्थास आळा: अनारोग्यदायी  पदार्थ जसे  बाहेरचे चिप्स, पाकीट मध्ये मिळणारे इतर पदार्थ हे आम्लपित्त उत्पन्न करण्यास कारणीभूत ठरतात. कारण हे सर्व पदार्थ आयुर्वेद अनुसार शिळ्या पदार्थांच्या श्रेणीत येतात. व त्यामुळे ते पचायला जड होऊन आम्लपित्ता उत्पन्न करतात. त्यामुळे ते टाळेलेच बरे.
  3. जेवणातील उष्मांक नियंत्रण : जास्त तेलकट किंवा जास्त तळेले पदार्थ शरीरात अजीर्ण निर्माण करून आम्लपित्त त्रास उत्पन्न करु शकतात.
  4. फलाहारचा स्विकार : आम्लपित्तामुळे होणार्‍या पोटात आग आणि जळजळ तसेच मळमळ ह्या साठी सकाळी नाश्तामध्ये विविध प्रकारचे ताजे फळ खाणे हे उत्तम उपाय आहे. टरबूज, खरबूज, डाळिंब, चिकू, सीताफळ, आवळा ही काही फळे आम्लपित्त शमन करण्यास उत्तम निवड आहे. ही सर्व फळ मधुर रस युक्त, पित्तास शमवणारी असून पोटाचे आरोग्य उत्तम प्रकारे जपणारी आहेत.
  5. अम्लपिता वाढवणार्‍य गोष्टींचा अस्विकार : आम्लपित्त वाढवणारी पदार्थ जसे आंबट, अंबवलेले, शिळे पदार्थ, बाहेरचे पदार्थ, अति प्रमाणात चहा किवा कॉफी, मद्यपान आणि धुम्रपान हे कायमचे टाळावे.

आम्लपित्त टाळण्यासाठी काही सामान्य असे आयुर्वेदिक उपाय :

प्रत्येक व्यक्ति ही वेगवेगळे दोष आणि प्रकृती संगठन घेऊन जन्माला आलेली असते. त्यामुळे प्रत्येक रुग्ण जारी एक सारखे व्याधी लक्षण घेऊन रुग्णालयात आला तरी त्याच्या उपचारासाठी वापरली जाणारी औषधे ही वेगळी असू शकतात. त्यामुळे वाचकांना ही विनंती की कृपया कुठेलेही औषधोपचार घेण्यापूर्वी तज्ञ वैद्यांचा सल्ला घ्यावा.

तरी काही सामान्य अशी सर्वांस लागू पडतील असे काही आयुव्रेदिक औषधे पुढील प्रमाणे आहे:

  • सकाळी अनुषापोटी अर्धा चमचा साधारण ३ ग्राम आवळा पावडर मधासह
  • धण्याचे पानी दिवसभरात थोडे थोडे पिणे
  • ज्येष्ठमध पावडर मधासह घेणे
  • अर्धा चमचा गुलकंद सकाळ संध्याकाळ
  • अर्धा चमचा मोरावळा सकाळ संध्याकाळ खाणे

आम्लपित्तामध्ये उपयुक्त असे पंचकर्म उपचार:

वमन आणि विरेचन हे आम्लपित्त व्याधीमध्ये अतिशय उपयुक्त ठरणारे असे पंचकर्म उपचार आहे. आम्लपित्ताचे मुळ असणारा आम हा शरीरातून बाहेर काढून शरीर शुद्ध करते.

निष्कर्ष / सारांश :

आम्लपित्त व्याधीची चिकित्सा करतांना आयुर्वेद सर्वांगीण बाजूने विचार करतो. योग्य पथ्यकर आहार विहार आणि आयुर्वेदिक औषधोपचार सह पंचकर्माने आम्लपित्त मूळापासून बरं करण्यास मदत करते.   

प्रत्येक रुग्णांसाठी वैयक्तिक आयुर्वेदीय सल्ला आणि उपचार हे आयुर्वेदिक वैद्यांकडून घेणे आवश्यक आहे. आयुर्वेदिक वैद्य हे तुमचे नाडी, प्रकृती, दोष संगठन, आणि अवस्था यांचा पूर्ण तपासणी करुन तुम्हाला औषधे आणि पंचकर्म सुचवतात. आयुर्विधी क्लिनिक मध्ये रुग्ण आल्यावर त्याची सविस्तर लक्षणे समजून घेऊन योग्य ते निदान करुन चिकित्सा करतो. त्यमुळे तुमच्या आम्लपित्ताचे योग्य हेतु शोधून व्याधी योग्य निवारण करतो.

पत्ता : डॉ. कौस्तुभ बाठे, आयुर्विधी क्लिनिक – आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक, ऑफिस नं 309, तिसरा मजला, पार्क प्लाझा बिझनेस सेंटर, पोरवाल रोड, लोहगाव, पुणे 411047.

 

Read More

पंचकर्म उपचार कसे कार्य करतात ??? : सहज सोपे सरळरित्या

मराठी व्याकरण आठवतयनं??? त्यात जसे आपण समास शिकलोय तसाच पंचकर्म हा सामासिक शब्द तयार झालाय.  पंचकर्म म्हणजे पाच कर्मांचा समूह. ते कोणते तर अनुक्रमे वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण. ह्यांचे फायदे नुकसान, कोणी कारावे कोणी करु नये हे वेगळ्या ब्लॉग मध्ये सविस्तर बघू. आजच्या विषयला धरुन पुढे जाऊ.

कुठला ही पदार्थ  किंवा पाककृती करतांना त्याला जसे पूर्व तयारी, कृती आणि नंतरची आवरावर असते तसेच पंचकर्म ह्या विधीला सुद्धा पूर्वकर्म, प्रधानकर्म आणि उत्तरकर्म किंवा पश्चात कर्म असतात.

पंचकर्माचा समावेश उपयोग आयुर्वेदात शोधण चिकित्सा म्हणून मुख्यत्वे वर्णन केलं आहे.  शोधण म्हणजे नेमके काय तर शरीरातील दूषित पदार्थ म्हणजे दोष बाहेर काढणे. पण ह्याची गरज काय? हेच दोष शरीरात राहून व्याधी घटक म्हणून कार्य करतात आणि व्याधी निर्मिती घडून आणतात. त्यामुळे ह्यांना म्हणजेच दोषांना शोधण क्रिया (पंचकर्माद्वारे ) बाहेर काढणे गरजेचे आहे.

पूर्वकर्म:

कुठलेही मोठे कार्य करतांना त्याची आपण  पूर्व तयारी करतो,  तसेच पंचकर्म करतांना पूर्वकर्म करणे तेवढीच  गरजेचे असते.

पूर्वकर्ममध्ये   दोन गोष्टी महत्वाच्या त्यात समाविष्ट आहेत 1. स्नेहन आणि 2. स्वेदन .

स्नेहन : स्नेह म्हणजे स्निग्ध पदार्थ. शरीरात स्निग्ध पदार्थ प्रविष्ट करणे म्हणजे स्नेहन . हे करायला दोन मार्गाद्वारे शरीरात प्रविष्ट केले जाते. १ . बाह्य मार्ग   २.अभ्यांतर मार्ग

बाह्य स्नेहन : शरीरावर बाहेरुन तेल आदि स्निग्ध पदार्थ लावून ते जिरेल अशा पद्धतीने हळुवारपणे संपूर्ण शरीरावर चोळणे म्हणजे बाह्य स्नेहन.

अभ्यांतर स्नेहन :  पचेल एवढ्या मात्रेत स्नेह पिणे व तो वर्धमान मात्रेत प्रती दिवस वाढवणे  या प्रक्रियेला अभ्यांतर स्नेहन म्हणतात.  साध्या सोप्या भाषेत तूप पिणे.

स्वेदन : शरीराला उष्ण उपचारांनी स्वेद म्हणजे घाम आणण्या क्रियेला स्वेदन असे म्हणतात. ही क्रिया औषधी काढ्याला तापवून त्याच्या वाफेणी केली जाते.

वरील दोन्ही कर्म रोज ३, ५ किंवा ७ दिवस वैद्य तुमची प्रकृती, वय, अवस्था , अग्नि, दोष, बल यांचा विचार करुन ठरवतात.

पण स्नेहन आणि स्वेदन  कशासाठी ?

 वरील दोन्ही उपक्रम हे शरीरातील घट्ट चिकटलेले व लीन झालेले दोषांना द्रवीत करुन  सुट्टे करायला मदत करते.  त्यामुळे दोष हे कोष्ठात आणावायस मदत करतात. जेणे करुन ते जवळच्या बाह्या मार्गाने शरीरा बाहेर काढले जातील अगदी सहज रित्या.

दोनही प्रकारचे स्नेहन आणि स्वेदन हे पूर्वकर्म प्रामुख्याने वमन, विरेचन, रक्तमोक्षण पूर्वी आवश्यक रित्या केले जाते. तर बस्ती आणि नस्य कर्म करण्या पूर्वी बाह्या स्नेहन आणि स्वेदन आवश्यक असते.    

प्रधान कर्म किंवा मुख्य कर्म :

हा प्रधान कर्म  विधी एका दिवसाचा असतो. या मध्ये कोष्ठात आणलेले दोष जवळच्या मार्गाने बाहेर काढले जातात.  जसे,

वमन – आमाशयात आलेले दोष ऊर्ध्व मार्गाने तोंड वाटे  उलटीद्वारे

विरेचन –  पक्वाशयात  आलेले दोष अधोमार्गाने शौचा वाटे  जुळबाद्वारे

बस्ती – पक्वाशयात  असलेले दोष बस्ती औषधांद्वारे शौचा वाटे  शरीरात प्रविष्ट करुन अधोमार्गाने बाहेर काढले जातात

रक्तमोक्षण – रक्तामधील दोष सिराद्वारे जलौका किंवा syringe च्या सहाय्याने

नस्य – शिर व त्याच्या संलग्न अवयव मधील दोष नाका वाटे  बाहेर काढले जातात

 

पश्चातकर्म किंवा उत्तरकर्म :

मुख्य कर्म व्यवस्थितरीत्या पार पाडल्यावर केली गेलेली आहार योजना हे पश्चात कर्मात येते. प्रधान करमानंतर येणारा थकवा आणि पुनः शरीर बल वाढवण्यासाठी आहार हा महत्वाचा भाग असतो. तो सहज पणे पाचवा या साथी प्रथम कोष्ण जलपान, कढण, पातळ पेज, खिचडी आणि मग भाकरी भाजी अशी उपाययोजना केली जाते . या प्रक्रियेला साधारण ३ ते ५ दिवसांचा कालावधी लागतो.

पश्चातकर्म किंवा उत्तरकर्म यांची आवश्यकता :

पंचकर्म नंतर शरीर बल हे अल्प असते व अग्नि किंचित मंद झालेला असतो त्यामुळे त्यावर लगेच पचायला जड असे पदार्थ सेवन केल्यास बलहानी होऊन उपद्रव स्वरूप नवीन व्याधी उत्पत्ति होऊ शकते. ते टाळण्यासाठी हा उपक्रम. आणि ह्या विधीने पंचकर्म केलयवर आहार सेवनाने अल्प जे दोष शरीरात राहतात त्यांचे  देखील पाचण होण्यास मदत होते.

अशा प्रकारे संपूर्ण विधिने केलेले पंचकर्म शरीरातील दोष बाहेर काढून तुमचे स्वास्थ्य टिकवण्यास मदत करते.

 

Read More