आयुर्वेद हे जीवनाचे शस्त्र आहे, यामध्ये जीवन सुखमय कसे जगावे हे संगितले आहे. आणि हे शरीर सुखमय राहण्याचे एक कारण आपल्या भोवतीचे हे पर्यावरण देखील आहे. आयुर्वेद शस्त्राचे सिद्धान्त हे सृष्टी क्रम व पंचमहाभूत ह्यांचा अभ्यास करून मांडले गेले आहेत. आयुर्वेदाचे मूलभूत सिद्धान्त हे पंचमहाभूतावर आधारित असून सृष्टीची उत्पत्ति करण्यास व मानव शरीर निर्माण करतात कारणीभूत ठरतात . आकाश, वायु, तेज, जल आणि पृथ्वी हे क्रमाने पंच महाभूतांची नवे.
ते कसे उत्पन्न होऊन पुढे परिणामन होतात ह्याचे छान वर्णन तैत्तिरीय उपनिषदात केले आहे:
तस्माद्वा एतस्मादात्मानं आकाशः सम्भूतः। आकाशाद्वायु:। वायोरग्निः।अग्नेरापः। अद्भ्यः पृथिवी। पृथिव्या ओषधयः। ओषधीभोन्नम्। अन्नात्पुरुषः। स वा एष पुरुषोऽन्नरसमयः।
अर्थ: प्रथम आकाश हा जागा किंवा पोकळी निर्माण करतो. तयार झालेल्या पोकळीत वायु हा अव्याहत मुक्त पणे विचरण करू लागतो. वायुच्या घर्षनातून उष्मा वाढून तेज तत्व उत्पन्न होते. तेजाचा उष्मा शांत झाल्यावर त्यातून जल निर्माण होते. तयार जल गोठले जाऊन त्यातून पृथ्वी तयार होते. पृथ्वी अनेक ओषधी व वनस्पति उत्पन्न करते. ह्या तयार वनस्पतींच्या रसावर मानव व इतर सजीव सृष्टी निर्माण व पोषित होते.
तसेच हे पंच महाभूत शरीरातील भाव पदार्थ देखील निर्माण करतात. आकाश आणि वायु मिळून वात दोषाची उत्पत्ति करतात. तेज आणि जल महाभूत हे दोघे मिळून पित्त दोषाचे संघटन तयार करते. जल आणि पृथ्वी हे कफ दोष उत्पन्न करतो.
पुरुषोऽयं लोकसम्मितः।
सर्वं द्रव्यं पांचभौतिकं अस्मिन् अर्थे।
म्हणजेच बघायला गेले सृष्टीतील महाभूत हे नुसतं पार्थिव सृष्टी व पर्यावरण करत नाही तर सजीव सृष्टी व त्यांचे पोषण देखील करते. अशा प्रकारे हे दोघेही एकमेकांवर अवलंबून असतात.
पर्यावरण जपणे आणि त्याचे संवर्धन करणे हे महत्वाचे आहे. कारण हेच महाभूत शरीर आणि पर्यावरण ह्यातील समतोल व बिघाड ह्याला करणीभूत असतात. त्यामुळे पर्यावरण सरंक्षण हे मानव कल्याणसाठी आवश्यक आहे.
त्यामुळे या पर्यावरण दिवशी आपण आपले पर्यावरणला जपणे व त्यातून आपले आरोग्य जपण्यास एक पाऊल पुढे उचलूया.
धन्यवाद