केशपतन आजच्या धावपळीच्या जगात एक सामान्य तक्रार झालेली आहे. काही तुम्ही सुद्धा ह्याने हैराण झालेले आहेत का? त्या थांबवण्यासाठी आणि केशांची वाढ निरोगी तसेच लांब घनदाट केसांसाठी काही आयुर्वेदिक पूर्णतः नैसर्गिक उपचार शोधत आहेत का? तर तुमच्या या केसांच्या तक्रारींसाठी आयुर्वेद शास्त्रकडे अनुभूत आणि खात्रीशीर असे उपाय आहेत. या लेख मध्ये आपण केस गळण्याचे कारण, त्यांचे आयुर्वेदिक निदान आणि चिकित्सा पाहणार आहोत.

केसपतन सामान्य दृष्टीकोण :

काही वर्षांपूर्वी झालेल्या एक संशोधनात असे आढळून आले आहे की एक सर्व सामान्य माणसांमध्ये दरदिवशी किमान 100 केस हे गळतात कमी जास्त प्रमाणात व ते नंतर नवीन येणार्‍या केसांनी बदलले जातात. मात्र त्या पेक्षा जास्त केश गळणे व नवीन केश तयार न होणे हि एक आरोग्याची तक्रार व चिंतेची बाब असू शकते.

केश पतन आणि आयुर्वेद दृष्टीकोण :

आयुर्वेदानुसार केश हा अस्थि धातूचा उपधातू आणी मज्जा धातूचा मल स्वरुपात उत्पन्न होतो. तसेच त्याचा पोषणामध्ये  रस धातु आणि रक्त धातु हे महत्वाची भूमिका पार पडतात.   त्रिदोष दुष्टि या सर्व गोष्टीस बाधा उत्पन्न करते. वात दोष रौक्ष्य उत्पन्न करुन केश गळण्यास कारण ठरतो. तर कफ आणि वात संयोग हा केश कुप बंद करुन नवीन उत्पन्न होणार्‍या केश वाढी मध्ये अडथळा करतो.

केस गळण्याची कारणे आयुर्वेद शास्त्रानुसार :

  • रात्री जागरण
  • अवेळी जेवण
  • पोटाचे आजार जसे की एसिडिटी, अल्सर, IBS
  • मद्यपान
  • धूम्रपान
  • अति प्रमाणात पित्तावर्धक आहाराचे सेवन
  • अति राग किंवा चिडचिड
  • मानसिक ताण आणि तणाव
  • पूर्वीचे जुने आजार जसे ताप, टायफाईड, गोवर, कांजण्या इत्यादि

इतर काही महत्वाची केस गळतीची कारणे :

  • B 12 जीवनसत्व कमतरता
  • D जीवनसत्व कमतरता
  • रक्ताची कमतरता

केसांची गळती कमी होण्यासाठी आयुर्वेदिक चिकित्सा:

केसगळती तक्रार कमी करताना आयुर्वेदानुसार त्याचा मुळाशी जाऊन कारणे शोधून त्याचे निवारण करुन चिकित्सा केली जाते. केसगळतीची आयुर्वेद चिकित्सा करताना आहार – विहार सुधारणे, तसेच योग्य पथ्य पालन करणे, तसेच आयुर्वेदिक औषधे आणि पंचकर्म उफार यांचा संपूर्ण एक सूत्रीपणाने काम केले जाते. या सोबतच केस लांब घनदाट वाढीसाठी विविध तेल लावणे हा सुद्धा एक उत्तम उपाय आहे.

 

केसांची गळती कमी होण्यासाठी आयुर्वेदिक उपाय :

  1. सकाळी अनुषापोटी अर्धा चमचा च्यवनप्राश खाणे
  2. अर्धा चमचा आवळा पावडर मधासह दिवसातून 2 वेळा घेणे
  3. जर मानसिक ताण आणि तणावमुळे केस गाळत असतील तर ब्राह्मी चूर्ण 250 मिलिग्राम मध किंवा पाण्यासह दिवसातून 2 वेळा घेणे
  4. केसांची वाढ होण्यासाठी अस्थिपोषक वटी 1-1 गोळी दिवसातून दोन वेळा घेणे.
  5. नारसिंह रसायन अर्धा चमचा सकाळी अनुषापोटी घेणे

 

केस गळणे कमी होण्यासाठी आणि वाढीसाठी काही आयुर्वेदिक तेल :

  1. वटजटादी तेल
  2. महा भृंगराज तेल
  3. सुकुंतल तेल (आयुर्विधी क्लिनिक द्वारा निर्मित )
  4. जपाकुसुमादी तेल

उपरोक्त सर्व तेल हे उत्तम केसांची निगा राखणारे आणि केसांची वाढ करणारे आहे.

केसांच्या तक्रारीसाठी पंचकर्म उपचार :

पंचकर्म ही आयुर्वेदाची शोधण उपचार पद्धती असून त्यामुळे शरीरात साठलेले सर्व दोष हे जवळच्या मार्गाने बाहेर काढले जातात. यामुळे केसांचे आरोग्य आणि केसांची वाढ होण्यास मदत होते.

वमनमुळे आमाशय आणि त्याला संलग्न असलेल्या अवयवतून सर्व दोष बाहेर काढले जातात. त्यामुळे पाचन सुधारून रस धातु पुष्ट होतो आणि केस वाढवण्यास मदत होते.

बस्ति हा केसांच्या समस्यांवर एक रामबाण उपाय आहे. बस्ति हा प्रामुख्याने वाताच्या प्रधान स्थान असणार्‍या पक्वाशयावर कार्य करतो त्यामुळे वात शमन होऊन केसांचे आरोग्य अबाधित राहते.

नस्य ही एक शामक स्वरुपात केस विकारांमध्ये वापरली जाते. नाकामध्ये योग्य असे तेल किंवा तूप सोडल्यामुळे थेट शिरामध्ये असणार्‍या केसांच्या मुळांवर कार्य करते आणि त्यांची वाढ होण्यास मदत करते.

रक्तमोक्षण यामुळे दुष्ट रक्त शरीरातून बाहेर काढले जाते. या क्रियेमुळे डोक्यामध्ये फोड, पूरल आणि कोंडा ह्या समस्यांचे निवारण होते. दुष्ट रक्त केस गळण्याचे एक कारण  असल्यामुळे रक्त मोक्षण हे फायद्याचे ठरते.

शिरोधारा मध्ये माथ्यावर तेलाची धार धरल्या जाते. त्यामुळे मानसिक ताण आणि तणाव कमी होत, झोप सुधारते. या सोबतच केसांच्या मुळांना बल प्रदान करते व केसांचे आरोग्य सुधारते. 

केसांच्या आरोग्यासाठी आहार विहार:

केसांच्या सुयोग्य वाढीसाठी आणि केस गळती थांबवण्यासाठी सकस आहार तुमच्या जेवणात आवश्यक आहे. त्यामध्ये योग्य प्रमाणात प्रथिने असणे आवश्यक आहे. जेवणात सर्व भाज्या , डाळी, भात आणि पोळी यांचा समावेश असावा. तसेच आवळा, दूध, तूप, लोणी, सुका मेवा जसे अक्रोड, बदाम, काळे मानूके, खोबर, खजूर  हे विशेष करुन असावे.

रात्री जागरण, धूम्रपान, मद्यपान, अति तळलेले पदार्थ, आंबट पदार्थ आणि अंबवलेले पदार्थ कटाक्षाने टाळावे.

विहार: मानसिक तान आणि तनाव हे केस गळतीचे प्रमुख कारण आहे. ते टाळणायस्थी प्राणायाम हा उत्तम उपाय आहे. अनुलोम-विलोम, भ्रामरी, सीतली, सित्कारी हे फार फायद्याचे ठरतात.

तसेच चंद्र-नमस्कार, पर्वतासन, वृक्षासन, अधोमुख श्वनासन हे योगा उपाय करावे. हे सर्व केसांचे गळणे थांबवण्यास व वाढीस मदत करते.

निष्कर्ष:

केसांच्या तक्रारींसाठी आयुर्वेदिक उपचार हे फार फायद्याचे ठरतात, कारण आयुर्वेदिक चिकित्सेमध्ये सर्व बाबींचा विचार करुन चिकित्सा उपक्रम हा आखला जातो. आयुवेदिक औषधे हे केसांना वाढ होण्यास आणि गळणे थांबवते तर पंचकर्म उपचार हे दोषांना शरीरातून बाहेर काढते. तर सुयोग्य आहार विहार हा दोषांचे शरीरातील समतोल रखणायस मदतकर ठरतात.

अशाच प्रकारच्या केसांच्या सर्व तक्रारींवर संपूर्ण खात्रीशीर आयुर्वेदिक आणि पंचकर्म उपचार आयुर्विधी क्लिनिकमध्ये उपलब्ध आहेत.