आसिडिटी किंवा आम्लपित्त ही आजच्या जगात बर्‍याच लोकांना भेडसावणारी एक सर्व सामान्य व्यथा झाली आहे. बरेच लोक वेगवेगळे घरघुती उपाय करतात किंवा पित्त कमी करणार्‍या गोळ्या (antacid) घेतात. पण त्याचा काही विशेष फरक दिसत नाही. पण हे गोळ्या खाऊन आम्लपित्त कमी करणे जर बर्‍याच काल पर्यन्त तसेच सुरु  राहिले तर मग त्याचे दुष्परिणाम मात्र कालांतराने दिसून येतात. आयुर्वेद मात्र आम्लपित्तकडे चिकित्सा दृष्टीने सर्व बाजूने वियचार करतो.  जसे त्याचे हेतु, आहार, विहार, आणि औषधोपचार. या लेखामध्ये आपण या सर्व बाबींना जाणून घेऊ या.

एसिडिटी आणि आयुर्वेदिकमत :

आम्लपित्त हे असिडिटी साठी केल्या जाणारे सर्व सामान्य निदान आहे. आम्लपित्त  या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. आम्ल म्हणजे आंबट  रसाने युक्त किवा विकृत झालेले पित्त.  हे विकृत पित्त स्वतःच्या प्रकृत गुण आणि कर्मांचा त्याग केल्यामुळे विविध तक्रारी निर्माण करतात.

आम्लपित्ताची सामान्य लक्षणे :

  • पोटात आग किंवा जळजळ
  • छातीत आग किंवा जळजळ
  • अपचन
  • मळमळ
  • क्वचित उलटीचा त्रास होणे
  • डोक दुखणे
  • गरगल्या सारखे वाटणे

अम्लपित्ताचे उपद्रव :

आम्लपित्ताची उपेक्षा केल्यास  म्हणजे योग्यवेळी उपचार न केल्यास पुढील तक्रारी उद्भवू शकतात;

  • पोटाचे गंभीर आजार
  • पोटाचे अल्सर किंवा आताड्यांना छिद्र पडणे
  • हाड कमकुवत होणे
  • सांधे दुखी
  • डोक्यात कोंडा होणे
  • केस गळणे

अम्लपित्ताचे सामान्य हेतु (आयुर्वेद मते ):

खाण्याच्या चुकीच्या सवयी

वेळेवर जेवण न करणे

वेळ उलटून गेलयवर जेवण करणे (उशिरा जेवणे )

आंबट किंवा आंबवलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाणे

मद्यपान

पोटात आम संचिती

मानसिक ताण आणि तनाव

उष्ण वातावरणमध्ये काम करणे इत्यादि

 

आम्लपित्त टाळण्यासाठी काही आयुर्वेद तिल सामान्य उपाय:

पथ्य किंवा आहारीय बदल :

 

  1. जेवणाच्या वेळा नियमित करणे : वेळेवर भुक लागल्यावर जेवण करणे हा अम्लपित्त टाळण्याचा उत्तम उपाय आहे. आम्लपित्ताचे मूळ हे जठराग्नीच्या वैषम्यतून असल्याकारणाने वेळेवर जेवण केल्याने वात प्रकोप कमी होते, तसेच पाचक रसांचे स्रवण योग्य रीतीने होण्यास मदत करते.
  2. अनारोग्यदायी पदार्थास आळा: अनारोग्यदायी  पदार्थ जसे  बाहेरचे चिप्स, पाकीट मध्ये मिळणारे इतर पदार्थ हे आम्लपित्त उत्पन्न करण्यास कारणीभूत ठरतात. कारण हे सर्व पदार्थ आयुर्वेद अनुसार शिळ्या पदार्थांच्या श्रेणीत येतात. व त्यामुळे ते पचायला जड होऊन आम्लपित्ता उत्पन्न करतात. त्यामुळे ते टाळेलेच बरे.
  3. जेवणातील उष्मांक नियंत्रण : जास्त तेलकट किंवा जास्त तळेले पदार्थ शरीरात अजीर्ण निर्माण करून आम्लपित्त त्रास उत्पन्न करु शकतात.
  4. फलाहारचा स्विकार : आम्लपित्तामुळे होणार्‍या पोटात आग आणि जळजळ तसेच मळमळ ह्या साठी सकाळी नाश्तामध्ये विविध प्रकारचे ताजे फळ खाणे हे उत्तम उपाय आहे. टरबूज, खरबूज, डाळिंब, चिकू, सीताफळ, आवळा ही काही फळे आम्लपित्त शमन करण्यास उत्तम निवड आहे. ही सर्व फळ मधुर रस युक्त, पित्तास शमवणारी असून पोटाचे आरोग्य उत्तम प्रकारे जपणारी आहेत.
  5. अम्लपिता वाढवणार्‍य गोष्टींचा अस्विकार : आम्लपित्त वाढवणारी पदार्थ जसे आंबट, अंबवलेले, शिळे पदार्थ, बाहेरचे पदार्थ, अति प्रमाणात चहा किवा कॉफी, मद्यपान आणि धुम्रपान हे कायमचे टाळावे.

आम्लपित्त टाळण्यासाठी काही सामान्य असे आयुर्वेदिक उपाय :

प्रत्येक व्यक्ति ही वेगवेगळे दोष आणि प्रकृती संगठन घेऊन जन्माला आलेली असते. त्यामुळे प्रत्येक रुग्ण जारी एक सारखे व्याधी लक्षण घेऊन रुग्णालयात आला तरी त्याच्या उपचारासाठी वापरली जाणारी औषधे ही वेगळी असू शकतात. त्यामुळे वाचकांना ही विनंती की कृपया कुठेलेही औषधोपचार घेण्यापूर्वी तज्ञ वैद्यांचा सल्ला घ्यावा.

तरी काही सामान्य अशी सर्वांस लागू पडतील असे काही आयुव्रेदिक औषधे पुढील प्रमाणे आहे:

  • सकाळी अनुषापोटी अर्धा चमचा साधारण ३ ग्राम आवळा पावडर मधासह
  • धण्याचे पानी दिवसभरात थोडे थोडे पिणे
  • ज्येष्ठमध पावडर मधासह घेणे
  • अर्धा चमचा गुलकंद सकाळ संध्याकाळ
  • अर्धा चमचा मोरावळा सकाळ संध्याकाळ खाणे

आम्लपित्तामध्ये उपयुक्त असे पंचकर्म उपचार:

वमन आणि विरेचन हे आम्लपित्त व्याधीमध्ये अतिशय उपयुक्त ठरणारे असे पंचकर्म उपचार आहे. आम्लपित्ताचे मुळ असणारा आम हा शरीरातून बाहेर काढून शरीर शुद्ध करते.

निष्कर्ष / सारांश :

आम्लपित्त व्याधीची चिकित्सा करतांना आयुर्वेद सर्वांगीण बाजूने विचार करतो. योग्य पथ्यकर आहार विहार आणि आयुर्वेदिक औषधोपचार सह पंचकर्माने आम्लपित्त मूळापासून बरं करण्यास मदत करते.   

प्रत्येक रुग्णांसाठी वैयक्तिक आयुर्वेदीय सल्ला आणि उपचार हे आयुर्वेदिक वैद्यांकडून घेणे आवश्यक आहे. आयुर्वेदिक वैद्य हे तुमचे नाडी, प्रकृती, दोष संगठन, आणि अवस्था यांचा पूर्ण तपासणी करुन तुम्हाला औषधे आणि पंचकर्म सुचवतात. आयुर्विधी क्लिनिक मध्ये रुग्ण आल्यावर त्याची सविस्तर लक्षणे समजून घेऊन योग्य ते निदान करुन चिकित्सा करतो. त्यमुळे तुमच्या आम्लपित्ताचे योग्य हेतु शोधून व्याधी योग्य निवारण करतो.

पत्ता : डॉ. कौस्तुभ बाठे, आयुर्विधी क्लिनिक – आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक, ऑफिस नं 309, तिसरा मजला, पार्क प्लाझा बिझनेस सेंटर, पोरवाल रोड, लोहगाव, पुणे 411047.