केसांचे आरोग्य आणि आयुर्वेद

केशपतन आजच्या धावपळीच्या जगात एक सामान्य तक्रार झालेली आहे. काही तुम्ही सुद्धा ह्याने हैराण झालेले आहेत का? त्या थांबवण्यासाठी आणि केशांची वाढ निरोगी तसेच लांब घनदाट केसांसाठी काही आयुर्वेदिक पूर्णतः नैसर्गिक उपचार शोधत आहेत का? तर तुमच्या या केसांच्या तक्रारींसाठी आयुर्वेद शास्त्रकडे अनुभूत आणि खात्रीशीर असे उपाय आहेत. या लेख मध्ये आपण केस गळण्याचे कारण, त्यांचे आयुर्वेदिक निदान आणि चिकित्सा पाहणार आहोत.

केसपतन सामान्य दृष्टीकोण :

काही वर्षांपूर्वी झालेल्या एक संशोधनात असे आढळून आले आहे की एक सर्व सामान्य माणसांमध्ये दरदिवशी किमान 100 केस हे गळतात कमी जास्त प्रमाणात व ते नंतर नवीन येणार्‍या केसांनी बदलले जातात. मात्र त्या पेक्षा जास्त केश गळणे व नवीन केश तयार न होणे हि एक आरोग्याची तक्रार व चिंतेची बाब असू शकते.

केश पतन आणि आयुर्वेद दृष्टीकोण :

आयुर्वेदानुसार केश हा अस्थि धातूचा उपधातू आणी मज्जा धातूचा मल स्वरुपात उत्पन्न होतो. तसेच त्याचा पोषणामध्ये  रस धातु आणि रक्त धातु हे महत्वाची भूमिका पार पडतात.   त्रिदोष दुष्टि या सर्व गोष्टीस बाधा उत्पन्न करते. वात दोष रौक्ष्य उत्पन्न करुन केश गळण्यास कारण ठरतो. तर कफ आणि वात संयोग हा केश कुप बंद करुन नवीन उत्पन्न होणार्‍या केश वाढी मध्ये अडथळा करतो.

केस गळण्याची कारणे आयुर्वेद शास्त्रानुसार :

  • रात्री जागरण
  • अवेळी जेवण
  • पोटाचे आजार जसे की एसिडिटी, अल्सर, IBS
  • मद्यपान
  • धूम्रपान
  • अति प्रमाणात पित्तावर्धक आहाराचे सेवन
  • अति राग किंवा चिडचिड
  • मानसिक ताण आणि तणाव
  • पूर्वीचे जुने आजार जसे ताप, टायफाईड, गोवर, कांजण्या इत्यादि

इतर काही महत्वाची केस गळतीची कारणे :

  • B 12 जीवनसत्व कमतरता
  • D जीवनसत्व कमतरता
  • रक्ताची कमतरता

केसांची गळती कमी होण्यासाठी आयुर्वेदिक चिकित्सा:

केसगळती तक्रार कमी करताना आयुर्वेदानुसार त्याचा मुळाशी जाऊन कारणे शोधून त्याचे निवारण करुन चिकित्सा केली जाते. केसगळतीची आयुर्वेद चिकित्सा करताना आहार – विहार सुधारणे, तसेच योग्य पथ्य पालन करणे, तसेच आयुर्वेदिक औषधे आणि पंचकर्म उफार यांचा संपूर्ण एक सूत्रीपणाने काम केले जाते. या सोबतच केस लांब घनदाट वाढीसाठी विविध तेल लावणे हा सुद्धा एक उत्तम उपाय आहे.

 

केसांची गळती कमी होण्यासाठी आयुर्वेदिक उपाय :

  1. सकाळी अनुषापोटी अर्धा चमचा च्यवनप्राश खाणे
  2. अर्धा चमचा आवळा पावडर मधासह दिवसातून 2 वेळा घेणे
  3. जर मानसिक ताण आणि तणावमुळे केस गाळत असतील तर ब्राह्मी चूर्ण 250 मिलिग्राम मध किंवा पाण्यासह दिवसातून 2 वेळा घेणे
  4. केसांची वाढ होण्यासाठी अस्थिपोषक वटी 1-1 गोळी दिवसातून दोन वेळा घेणे.
  5. नारसिंह रसायन अर्धा चमचा सकाळी अनुषापोटी घेणे

 

केस गळणे कमी होण्यासाठी आणि वाढीसाठी काही आयुर्वेदिक तेल :

  1. वटजटादी तेल
  2. महा भृंगराज तेल
  3. सुकुंतल तेल (आयुर्विधी क्लिनिक द्वारा निर्मित )
  4. जपाकुसुमादी तेल

उपरोक्त सर्व तेल हे उत्तम केसांची निगा राखणारे आणि केसांची वाढ करणारे आहे.

केसांच्या तक्रारीसाठी पंचकर्म उपचार :

पंचकर्म ही आयुर्वेदाची शोधण उपचार पद्धती असून त्यामुळे शरीरात साठलेले सर्व दोष हे जवळच्या मार्गाने बाहेर काढले जातात. यामुळे केसांचे आरोग्य आणि केसांची वाढ होण्यास मदत होते.

वमनमुळे आमाशय आणि त्याला संलग्न असलेल्या अवयवतून सर्व दोष बाहेर काढले जातात. त्यामुळे पाचन सुधारून रस धातु पुष्ट होतो आणि केस वाढवण्यास मदत होते.

बस्ति हा केसांच्या समस्यांवर एक रामबाण उपाय आहे. बस्ति हा प्रामुख्याने वाताच्या प्रधान स्थान असणार्‍या पक्वाशयावर कार्य करतो त्यामुळे वात शमन होऊन केसांचे आरोग्य अबाधित राहते.

नस्य ही एक शामक स्वरुपात केस विकारांमध्ये वापरली जाते. नाकामध्ये योग्य असे तेल किंवा तूप सोडल्यामुळे थेट शिरामध्ये असणार्‍या केसांच्या मुळांवर कार्य करते आणि त्यांची वाढ होण्यास मदत करते.

रक्तमोक्षण यामुळे दुष्ट रक्त शरीरातून बाहेर काढले जाते. या क्रियेमुळे डोक्यामध्ये फोड, पूरल आणि कोंडा ह्या समस्यांचे निवारण होते. दुष्ट रक्त केस गळण्याचे एक कारण  असल्यामुळे रक्त मोक्षण हे फायद्याचे ठरते.

शिरोधारा मध्ये माथ्यावर तेलाची धार धरल्या जाते. त्यामुळे मानसिक ताण आणि तणाव कमी होत, झोप सुधारते. या सोबतच केसांच्या मुळांना बल प्रदान करते व केसांचे आरोग्य सुधारते. 

केसांच्या आरोग्यासाठी आहार विहार:

केसांच्या सुयोग्य वाढीसाठी आणि केस गळती थांबवण्यासाठी सकस आहार तुमच्या जेवणात आवश्यक आहे. त्यामध्ये योग्य प्रमाणात प्रथिने असणे आवश्यक आहे. जेवणात सर्व भाज्या , डाळी, भात आणि पोळी यांचा समावेश असावा. तसेच आवळा, दूध, तूप, लोणी, सुका मेवा जसे अक्रोड, बदाम, काळे मानूके, खोबर, खजूर  हे विशेष करुन असावे.

रात्री जागरण, धूम्रपान, मद्यपान, अति तळलेले पदार्थ, आंबट पदार्थ आणि अंबवलेले पदार्थ कटाक्षाने टाळावे.

विहार: मानसिक तान आणि तनाव हे केस गळतीचे प्रमुख कारण आहे. ते टाळणायस्थी प्राणायाम हा उत्तम उपाय आहे. अनुलोम-विलोम, भ्रामरी, सीतली, सित्कारी हे फार फायद्याचे ठरतात.

तसेच चंद्र-नमस्कार, पर्वतासन, वृक्षासन, अधोमुख श्वनासन हे योगा उपाय करावे. हे सर्व केसांचे गळणे थांबवण्यास व वाढीस मदत करते.

निष्कर्ष:

केसांच्या तक्रारींसाठी आयुर्वेदिक उपचार हे फार फायद्याचे ठरतात, कारण आयुर्वेदिक चिकित्सेमध्ये सर्व बाबींचा विचार करुन चिकित्सा उपक्रम हा आखला जातो. आयुवेदिक औषधे हे केसांना वाढ होण्यास आणि गळणे थांबवते तर पंचकर्म उपचार हे दोषांना शरीरातून बाहेर काढते. तर सुयोग्य आहार विहार हा दोषांचे शरीरातील समतोल रखणायस मदतकर ठरतात.

अशाच प्रकारच्या केसांच्या सर्व तक्रारींवर संपूर्ण खात्रीशीर आयुर्वेदिक आणि पंचकर्म उपचार आयुर्विधी क्लिनिकमध्ये उपलब्ध आहेत.

Read More

पंचकर्म उपचार कसे कार्य करतात ??? : सहज सोपे सरळरित्या

मराठी व्याकरण आठवतयनं??? त्यात जसे आपण समास शिकलोय तसाच पंचकर्म हा सामासिक शब्द तयार झालाय.  पंचकर्म म्हणजे पाच कर्मांचा समूह. ते कोणते तर अनुक्रमे वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण. ह्यांचे फायदे नुकसान, कोणी कारावे कोणी करु नये हे वेगळ्या ब्लॉग मध्ये सविस्तर बघू. आजच्या विषयला धरुन पुढे जाऊ.

कुठला ही पदार्थ  किंवा पाककृती करतांना त्याला जसे पूर्व तयारी, कृती आणि नंतरची आवरावर असते तसेच पंचकर्म ह्या विधीला सुद्धा पूर्वकर्म, प्रधानकर्म आणि उत्तरकर्म किंवा पश्चात कर्म असतात.

पंचकर्माचा समावेश उपयोग आयुर्वेदात शोधण चिकित्सा म्हणून मुख्यत्वे वर्णन केलं आहे.  शोधण म्हणजे नेमके काय तर शरीरातील दूषित पदार्थ म्हणजे दोष बाहेर काढणे. पण ह्याची गरज काय? हेच दोष शरीरात राहून व्याधी घटक म्हणून कार्य करतात आणि व्याधी निर्मिती घडून आणतात. त्यामुळे ह्यांना म्हणजेच दोषांना शोधण क्रिया (पंचकर्माद्वारे ) बाहेर काढणे गरजेचे आहे.

पूर्वकर्म:

कुठलेही मोठे कार्य करतांना त्याची आपण  पूर्व तयारी करतो,  तसेच पंचकर्म करतांना पूर्वकर्म करणे तेवढीच  गरजेचे असते.

पूर्वकर्ममध्ये   दोन गोष्टी महत्वाच्या त्यात समाविष्ट आहेत 1. स्नेहन आणि 2. स्वेदन .

स्नेहन : स्नेह म्हणजे स्निग्ध पदार्थ. शरीरात स्निग्ध पदार्थ प्रविष्ट करणे म्हणजे स्नेहन . हे करायला दोन मार्गाद्वारे शरीरात प्रविष्ट केले जाते. १ . बाह्य मार्ग   २.अभ्यांतर मार्ग

बाह्य स्नेहन : शरीरावर बाहेरुन तेल आदि स्निग्ध पदार्थ लावून ते जिरेल अशा पद्धतीने हळुवारपणे संपूर्ण शरीरावर चोळणे म्हणजे बाह्य स्नेहन.

अभ्यांतर स्नेहन :  पचेल एवढ्या मात्रेत स्नेह पिणे व तो वर्धमान मात्रेत प्रती दिवस वाढवणे  या प्रक्रियेला अभ्यांतर स्नेहन म्हणतात.  साध्या सोप्या भाषेत तूप पिणे.

स्वेदन : शरीराला उष्ण उपचारांनी स्वेद म्हणजे घाम आणण्या क्रियेला स्वेदन असे म्हणतात. ही क्रिया औषधी काढ्याला तापवून त्याच्या वाफेणी केली जाते.

वरील दोन्ही कर्म रोज ३, ५ किंवा ७ दिवस वैद्य तुमची प्रकृती, वय, अवस्था , अग्नि, दोष, बल यांचा विचार करुन ठरवतात.

पण स्नेहन आणि स्वेदन  कशासाठी ?

 वरील दोन्ही उपक्रम हे शरीरातील घट्ट चिकटलेले व लीन झालेले दोषांना द्रवीत करुन  सुट्टे करायला मदत करते.  त्यामुळे दोष हे कोष्ठात आणावायस मदत करतात. जेणे करुन ते जवळच्या बाह्या मार्गाने शरीरा बाहेर काढले जातील अगदी सहज रित्या.

दोनही प्रकारचे स्नेहन आणि स्वेदन हे पूर्वकर्म प्रामुख्याने वमन, विरेचन, रक्तमोक्षण पूर्वी आवश्यक रित्या केले जाते. तर बस्ती आणि नस्य कर्म करण्या पूर्वी बाह्या स्नेहन आणि स्वेदन आवश्यक असते.    

प्रधान कर्म किंवा मुख्य कर्म :

हा प्रधान कर्म  विधी एका दिवसाचा असतो. या मध्ये कोष्ठात आणलेले दोष जवळच्या मार्गाने बाहेर काढले जातात.  जसे,

वमन – आमाशयात आलेले दोष ऊर्ध्व मार्गाने तोंड वाटे  उलटीद्वारे

विरेचन –  पक्वाशयात  आलेले दोष अधोमार्गाने शौचा वाटे  जुळबाद्वारे

बस्ती – पक्वाशयात  असलेले दोष बस्ती औषधांद्वारे शौचा वाटे  शरीरात प्रविष्ट करुन अधोमार्गाने बाहेर काढले जातात

रक्तमोक्षण – रक्तामधील दोष सिराद्वारे जलौका किंवा syringe च्या सहाय्याने

नस्य – शिर व त्याच्या संलग्न अवयव मधील दोष नाका वाटे  बाहेर काढले जातात

 

पश्चातकर्म किंवा उत्तरकर्म :

मुख्य कर्म व्यवस्थितरीत्या पार पाडल्यावर केली गेलेली आहार योजना हे पश्चात कर्मात येते. प्रधान करमानंतर येणारा थकवा आणि पुनः शरीर बल वाढवण्यासाठी आहार हा महत्वाचा भाग असतो. तो सहज पणे पाचवा या साथी प्रथम कोष्ण जलपान, कढण, पातळ पेज, खिचडी आणि मग भाकरी भाजी अशी उपाययोजना केली जाते . या प्रक्रियेला साधारण ३ ते ५ दिवसांचा कालावधी लागतो.

पश्चातकर्म किंवा उत्तरकर्म यांची आवश्यकता :

पंचकर्म नंतर शरीर बल हे अल्प असते व अग्नि किंचित मंद झालेला असतो त्यामुळे त्यावर लगेच पचायला जड असे पदार्थ सेवन केल्यास बलहानी होऊन उपद्रव स्वरूप नवीन व्याधी उत्पत्ति होऊ शकते. ते टाळण्यासाठी हा उपक्रम. आणि ह्या विधीने पंचकर्म केलयवर आहार सेवनाने अल्प जे दोष शरीरात राहतात त्यांचे  देखील पाचण होण्यास मदत होते.

अशा प्रकारे संपूर्ण विधिने केलेले पंचकर्म शरीरातील दोष बाहेर काढून तुमचे स्वास्थ्य टिकवण्यास मदत करते.

 

Read More